मोदींनी आपल्या भाषणात देशाला संबोधित केले. नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
मोदी काय म्हणाले.??
पुढचा काळ हा सणासुदीचा काळ आहे. मात्र सण चालू असूनही आपल्याला विसरायचं नाही आहे की कोरोना गेलेला नाही. योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे फेटालिटी रेट कमी आहे. मात्र तरीही भारत बाहेरील देशांच्या तुलनेत आपल्या देशात जास्तीत जास्त नागरीकांच जीवन वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. बाहेरच्या देशांमध्ये मृत्यू दर ही जास्त आहे त्या तुलनेत वेळीच उपाययोजना केल्याने भारत आता योग्य दिशेने वाटचाल करत आहे। देशात कोरोना ची स्थिती अधोरेखीत करत मोदींनी देशातील रिकव्हरी रेट ची आकडेवारी ही सांगितली. आपण लवरकच याही संकटावर मात करू अशी आशा व्यक्त केली.
टेस्टिंग ची संख्या मोठी असल्याने मोठी मदत झाली. योग्य वेळी निदान झाल्याने मोठी हानी टाळता आली.
डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचं कौतूक करत मोदी म्हणाले, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिले आहे. या लोकांचे आभार मानावे तेवढे थोडे. त्याच बरोबर सध्याच्या स्थितिवर वर बोलत मोदी म्हणाले, बेसावध होऊ नका, अजूनही आजार संपलेला नाही. सतर्क राहण्याची गरज आहे. आता सगळीकडे सण सुरू होते आहेत शक्य तेवढे जागृत राहण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.
कोरोना नंतर आता आर्थिक गाडा वेग घेत आहे. आपण हळू हळू या स्थीतीतून आभार येतो आहे.
मात्र जो पर्यंत पूर्ण यश येत नाही बेजबाबदार पणा करू नये.
देशाचे वैज्ञानिक वाक्सिनसाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. यावर वेगानं काम सुरू आहे. कित्येक Vacsine वर काम काही वेगात प्रगती करत आहेत. लवकरात लवकर प्रत्येक पोहोचले पाहिजे यावर काम चालू आहे. वेगवेगळ्या वाक्सिन वर भारतात युद्धपातळीवर काम सुरू असून प्रत्येक भारतीया पर्यन्त ही लास शक्य तितक्या लवकर पोहोचवण्यात येईल. मात्र लस येत नाही तोवर काम चालू ठेवा, मात्र बेजबाबदार वागू नका असेही मोदी सांगायला विसरले नाही.
सोशल distansing , हात धुणे , योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे याच ध्यान ठेवा हा सण तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि समृद्धी चा असेल अशी इच्छा व्यक्त करतो.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या लोकांना आवाहन जेवढी जास्त जनजागृती करू शकाल तेवढी मदत होईल. असेही मोदींच्या भाषणात मोदींनी सांगितले.