जगभरातील खेळाडू जसे आपल्या खेळाने प्रसिद्ध असतात तसेच ते आपल्या वयक्तिक आयुष्यातील घडामोडी मुळे सुद्धा प्रकाशझोतात असतात. जगप्रसिद्ध फुटबॉलपट्टू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) ह्याला कुणी ओळखत नसेल तर नवलच. आपल्या खेळाने त्याने आपले नाव एवढे उंचावर नेऊन ठेवलं आहे की प्रत्येक नवीन फुटबॉल खेळाडू त्यासारखाच बनण्याच्या हेतूने ह्या क्षेत्रात प्रवेश करत असतो.
क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्या खेळाने तर प्रसिद्ध आहेच पण आपल्या अलिशान राहणीमानामुळे सुद्धा ओळखला जातो. आताच त्याने जगातील सर्वात महागडी कार विकत घेऊन एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. नेहमीच स्पोर्ट्स कार तयार करणारी बुगाती ह्या कंपनीची ला वोइतूर नोइरे ही कार त्याने खरेदी केली आहे.
ह्या कारची किंमत ऐकुन तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. सामान्य माणूस आयुष्भर काम करत राहिला तरी एवढे पैसे कमावू शकत नाही. ह्या गाडीची किंमत ८.५ मिलियन यूरोज म्हणजेच भारतीय पैशात ७५ करोड एवढी आहे. ही आनंदाची बातमी त्याने आपल्या चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
ह्या गाडी सोबत त्याने आपला शर्ट लेस फोटो शेअर केला आहे. ही गाडी बुक जरी त्याने आता केली असली तरी ह्याची डिलिव्हरी त्याला २०२१ मध्ये होईल असे बुगाती कंपनी कडून सांगण्यात आले आहे. २.४ सेकंदात ही कार ० ते ६० किमी प्रती तास धावते. ह्या गाडीचा सर्वाधिक स्पीड ३६० किमी प्रती तास आहे.
रोनाल्डो कडे सध्या एस्टन मार्टिन, मर्सिडीज सी क्लास स्पोर्ट कूप, मैक्लॉरेन एमपी4 12सी, लैम्बोर्गिनी एवेंटाडोर एलपी700-4, बेंतले कॉटिनेंटल जीटीसी स्पीड, रोल्स रॉयस फैंटम और फरारी 599 जीटीओ अशा गाड्या आपल्या ताफ्यात आहेत.
1 Comment