मनोरंजन

Cubicles Season 2 : अशी वेब सिरीज जी पाहिल्यावर तुम्हाला वाटेल का संपवली लगेच

TVF ची सिरीज म्हटली की डायरेक्ट काळजात हात घातलं जातं असं काहीसे होतं. ते जे काही विषय आपल्या समोर घेऊन येतात ना ते नेहमीच आपल्यातले वाटतात. यात प्रामुख्याने विचार केलात तर पंचायत, Aspirants, कोटा फॅक्टरी, गुल्लक, Pitchers, Permanent Roommates, ये मेरी फॅमिली, Tripling आणि Cubicles यांचा समावेश आहे.
काहीच दिवसापूर्वी Cubicles या सिरिजाचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला. या आधी Cubicles चा पहिला सिझन यूट्यूबवर फ्री मध्ये लोकांसाठी प्रदर्शित केला होता. पण यावेळी मात्र प्रेक्षकांनी या सिरिजला एवढे प्रेम दिलं की याचे सर्व हक्क सोनी वाहिनीने खरेदी करून आपले प्लॅटफॉर्म सोनी लिव वर याचा दुसरा सिझन प्रदर्शित करण्यात आला आहे.

Cubicles म्हणजे नक्की आहे तरी काय? काही लोकांना याचा अर्थ सुद्धा माहीत नसेल. तर Cubicles म्हणजे एक अशी जागा जिथे आपण आपले संपूर्ण आयुष्य ऑफिसमध्ये व्यतीत करतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही ऑफिस मध्ये बसता ती जागा म्हणजे तुमचा डेस्क. याच विषयावर ही सिरीज बनवण्यात आली आहे.

सिरीज बद्दल सांगायचे झाले तर सिरीज नेहमीच भाव खाऊन जातो. प्रत्येक एपिसोड एवढा तगडा आहे मी तुम्ही जागेवरून उठू शकणार नाही. आणि एपिसोड संपला की पुढे काय होणार यासाठी पुढील एपिसोड सुद्धा नक्की बघाल. यात जे पात्र दाखवले आहेत ते तुम्हाला आपलेसे वाटतील. जणू आपलेच आयुष्य कुणी पडद्यावर मांडले आहे असा भास होतो. एवढे सुंदर ही सिरीज तयार करण्यात आली आहे.

पीयूष हे मुख्य मात्र या सिरीज मध्ये आहे. त्याने एवढे सुंदर काम केलं आहे की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघताना असे कुठेच वाटतं नाही की तो अभिनय करतोय. जणू खऱ्या आयुष्यात त्याच्या हे सर्व घडते असेच वाटत राहते. सिरीज मध्ये गौतम, सूनैना, नवीन, मेघा, अंगद, सुप्रिया, आणि आर डी एक्स यांच्या भूमिका तर अशा आहेत की जणू तुम्हाला वाटून राहील की तुमच्याही आयुष्यात असे पात्र कुठे ना कुठे आजूबाजूला फिरत आहेत.

आर डी एक्स ची भूमिका साकारणारे जैमिनी पाठक तर एवढे भाव खाऊन जातात की तुम्ही सुद्धा म्हणाल की असे चारेक्टर प्रत्येक ऑफिस मध्ये असते. एकंदर काय तर Cubicles ही सिरीज तुम्ही वेळ काढून पाहिली पाहिजे. याचे कारण म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जे काही चांगलं वाईट घडते, प्रमोशन मिळतं, एवढेच काय तर सुट्टी साठी केलेले अथक परिश्रम असे असतात याचे उत्तम उदाहरण या सिरीज मध्ये दाखवण्यात आले आहेत.

Source Tvf Social Handle

सिरीज मध्ये पियुशच्या भूमिकेत अभिषेक, गौतमच्या भूमिकेत बद्री, मेघाच्या भूमिकेत निधी बिष्ट, सूनैनाच्या भूमिकेत आयुष्य गुप्ता, अंगदच्या भूमिकेत शिवांकित परिहार, नवीनच्या भूमिकेत निकेतन शर्मा आणि सुप्रियाच्या भूमिकेत खुशबू बैद आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *