बातमी

आफ्रिकेतील महिलेने दिला एका एलियन सारख्या मुलाला जन्म, बापाने स्वीकारले नाही

ईस्ट आफ्रिकेच्या रवांडा बेजेनेजा लिबर्टा या परिवारातील महिलेने एका मुलाला जन्म दिला पण त्या मुलाच्या विचित्र चेहर्यामुळे त्या बापाने आई आणि मुलाला वाऱ्यावर सोडले आहे. आई आणि वडील जे आपल्या मुलांसाठी काळजाचं पाणी करतात त्याला बरे नसेल तर नको ते उपचार करतात. पण आफ्रिकेतील युगांडा येतील एका बापाने आपल्या मुलाला न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्या आईलाही ताकीद दिली की, तुला नवरा हवा असेल तर मुलाला सोडायला हवे. आता ती आई आपल्या मुलाला घेऊन तिच्या माहेरी राहत आहे पण तिथेही त्या मुलाला सैतान म्हणत आहेत. तिच्या नवऱ्याला वाटते की त्यांचा हा मुलगा एक सैतान आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे पण त्या ममतेने भरलेल्या महिलेने आपल्या मुलाला स्वीकारले आणि नवऱ्याचे घर सोडले.

आता ती स्वतः मुलाच्या इलाज करत आहे. त्याचा इलाज करण्यासाठी पैसा गोळा करत आहे. तिने आपल्या या मुलाची काहींनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. डॉक्टर ही त्याच्यावर उपचार करण्याबरोबरच त्याची अशी परिस्थिती का झाली याच्यावर संशोधन करत आहेत. त्या महिलेने जेव्हा त्या मुलाला जन्म दिला तेव्हा ते ठिकाण त्यांच्या गावापासून लांब होते पण जेव्हा मुलाला पाहिले तेव्हा त्याचा बाप तिथून पळाला.

पण जेव्हा त्या महिलेने बापाला फोन केला तेव्हा त्याने अशा मुलाला स्विकरण्यास विरोध केला. त्यानंतर एका भल्या व्यक्तीने त्या महिलेला तिच्या सासरी सोडले पण आजूबाजूचे सर्वच लोक त्या मुलाला एलियन बोलू लागले त्यामुळे त्या महिलेला तिथून जाण्याचा निर्णय घेतला.

आता तिने सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या इलाजासाठी मदत मागितली आहे. देव करो तिची इच्छा लवकर पूर्ण होवो. आई ही फक्त आईच असते तिचा मुलगा कोणत्याही परिस्थितीत असो तिला सहन होत नाही ती त्याच्यापाठी नेहमीच उभी राहते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *