बातमी

ह्या रॅपरने डोक्यावर सर्जरी करून लावले चक्क सोन्याचे केस

लंडन: आजकाल लोक प्रसिद्धीस येण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. साधे जीवन जगण्याने आम्ही कधी प्रकाशझोतात येऊच शकत नाही अशी काही लोकांची मानसिकता असते. मग अशातच जन्म होतो एका वेगळ्या बुद्धीचा, मग अशावेळी ही लोक नवनवीन आयडिया घेऊन समोर येत असतात. तुम्ही सुद्धा अशी अनेक बरीचशी उदाहरणे आसपास पाहिलीच असतील.

आज सुद्धा आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने असा काही कारणामा केला आहे की सर्वच स्तरावरून त्याला विभिन्न प्रतिक्रिया मिळत आहेत. कुणी चांगलं तरी कुणी मूर्खपणा म्हणत आहेत. या व्यक्तीचं नाव डॅन सुर आहे आणि तो लंडन मध्ये स्थायिक आहे. डॅन एक उत्कृष्ट रॅपर तर आहेच शिवाय आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळे कारनामे करून नेहमीच लोकांना तो चकित करत असतो.

Source Dan Sur Social Handle

त्याच्या रॅप साँग मध्ये किंवा रिल्स मध्ये सुद्धा तो लोकांना मोठमोठ्या गाड्या, डायमंड, सोन्याच्या विटा दाखवून लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. त्याचा कंटेंट हा एका वेगळ्या धाटणीचा आहे. पण आता तर त्याने सर्व हद्द सोडून चक्क आपले केसच सर्जरी करून त्या ठिकाणी सोन्याच्या आणि गोल्डन ने भरलेल्या चैन लावल्या आहेत. त्यामुळे त्याचा पूर्णतः चेहरा मोहरा बदलून गेला आहे.

अशी केसांची सर्जरी करून ट्रान्सप्लांट करणारा जगातील तो पहिलाच मनुष्य ठरला आहे. हे दिसायला जरी सोपं दिसतं तरी भविष्यात ह्या गोष्टीचा त्याला त्रासच होणार आहे. कारण आपले केस एवढे हलके असतात तरी ते आपल्याला जड लागतात आणि अशात डॅन सुरने एवढ्या जड चैन डोक्यावर लावल्या असताना त्याला ते जगण्यात अशक्य जाईल.

Source Dan Sur Social Handle

ही सर्जरी करून डॅन सुरने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांना याबद्दल माहिती दिली. पण या सर्जरी मुळे समाजात दुहेरी संदेश जात आहे. जी युवा पिढी डॅनला मनापासून मानतात त्यांच्याही मनात असे काही करण्याच्या गोष्टी येऊ शकतात म्हणून पालक सुद्धा संतप्त आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *