मनोरंजन

देवमाणूस २ मध्ये होत आहे नवीन अभिनेत्रीचा प्रवेश कोण आहे ती बघा

आता नव्याने सुरू झालेल्या देवमाणूस २ या मालिकेत नक्की काय काय होणार याची उस्तुकता अनेक चाहत्यांना लागली आहे. आता त्या गावात अजित कुमार म्हणजे डॉक्टर नटवरलाल बनून आला आहे. सध्या या मालिकेत नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे ती कोण आहे याची सर्वांनाच उस्तुक्ता असेलच तर ती आहे ” लागिर झालं जी” या मालिकेतील सुमन काकी म्हणजे शिवानी घाडगे ही अभिनेत्री देवमाणूस २ या मालिकेत दिसणार आहे.

लागिर झालं जी या मालिकेत ती सुमन काकी शीतल जवळ नेहमीच आपले मन मोकळे करताना दिसत असते त्यामुळे ही सुमन काकी प्रेक्षकांना नेहमीच आपली वाटली आहे. देवमाणूस या मालिकेत या अभिनेत्रीचा आपल्याला नवीन लूक पाहायला मिळनार आहे ती आपल्याला स्टायलिश आणि ग्लॅमरस अशा लूक मध्ये पाहायला मिळणार आहे.

देवमाणूस २ मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे गावातील सर्वच लोकांना हा नटवरलाल डॉक्टरच आहे असे वाटते. गावाच्या कामासाठी सरपंचाने कामाला कॉन्ट्रॅक्टर बोलावले आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या गाडीतून त्याच्यासोबत त्याची बायको ही उतरते. पण आपल्या नवऱ्याच्या सांगण्यावरून ती पुन्हा गाडीत बसते डॉक्टरची नजर त्या बाईवर जाते आणि नवीन पाखरू जाळ्यात सापडला या आविर्भावात त्याच्या तोंडावर हसू येते.

शिवानी घाडगे हीचा मुळात गाव इस्लामपूर आहे. तिथेच तीच सर्व शिक्षण झाले त्यानंतर नाटकात काम ही केले. पाळशीची पिटी या चित्रपटातून ती दिसली आहे. तिचा हा मोठ्या पडद्यावरील पहिला चित्रपट आहे. पण आता एखादी सुंदर अभिनय साकारताना दिसणार आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *