मनोरंजन

देवमाणूस मालिकेचा असा शेवट तुम्हाला पटला का?

झी मराठीवरील सर्वात जास्त टीआरपी देणारी मालिका म्हणजे देवमाणूस, पण नंतर या मालिकेला जास्तच तानत नेल आणि नको तिथं तानल त्यामुळे हळू हळू ही मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरत गेली. आता ही मालिका बंद करण्याच्या ऐवजी वाढवता का नेली हे तुम्हाला माहित आहे.

सध्याचं या मालिकेचा शेवट करण्यात आला पण हा असा शेवट पाहून प्रेक्षकच हादरले आहेत. इतका फालतू शेवट कोणालाच स्वीकार नाही आहे. कसा असणार त्याने इतके खून केले लोकांना लुबाडले. त्याच्या एकही पुरावा न सापडता ती अलगद मोकळा होतो. याशिवाय शेवटच्या भागात काय दाखवले तर चंदा त्याच्या डोक्यात इतका मोठा दगड घालते तरी तो जिवंत दाखवला.

शेवटी ती चलाख डिंपल चंदाचा खून करताना दाखवली आहे. काय अर्थ आहे या शेवटाला? कोणालाच पटणार नाही. हा असा शेवट करण्या मागे एकच उद्देश  देवमाणूस २ येणार पण तरीही या मालिकेचा जो शेवट केला आहे त्यावरून देवमाणूस २ लोक बघतील का हाच मोठा प्रश्न आहे

शेवट असा व्हायला पाहिजे होता की त्या डॉक्टरचे कारनामे सर्वांसमोर उघड व्हायला पाहिजे होते. पण दिग्दर्शकाने तसे केलेच नाही, त्यांना दुसरा भाग प्रेक्षकांच्या बोकांडी मारायचा आहे. पण हे कितपर्यंत चालणार अरे संपवा ना हा इथे दुसरा काहीतरी नवीन काढा जे प्रेक्षकांना आवढेल. पण नाही याचा अर्थ तुमच्याकडे दाखवायला चांगल अस काहीच नाही तेच ते ओढून ताणून दाखवायचं बस.

तस पाहायला गेलात तर यातील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केले आहे. डॉक्टर अजित कुमार, टोण्या, आजी, डिंपल,चंदा, बाबू दादा, मंगल यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. कधी कधी यांच्याकडून ओव्हर अक्टिंग ही झाली आहे पण चालायचंच. कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते. तुम्हाला हा असा शेवट पचनी पडला का? नक्की सांगा आम्हाला.

Previous ArticleNext Article

1 Comment

  1. Shevat Baghun Ashe Vatale ki ka mi bagat hoto Dev Manus serial Fukat Time West kela baghun ata dusara bhag jari ala tari ajibat baghayache nahi ashe sampurn family ne tharavala ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *