Uncategorized

देवमाणूस मालिकेत ह्या हॉट अभिनेत्रीची एन्ट्री

झी मराठी वाहिनी नेहमीच आपल्या मालिकांमध्ये एक वेगळेपण लोकांसमोर सादर करत असते. झी वर आलेला चेहरा रातोरात प्रकाशझोतात येतो. सध्या झी मराठीवर अनेक मालिका सुरू आहेत. ह्यात देवमाणूस ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वात वर आहे. देवमाणूस ही मालिका जेव्हा सुरू झाली त्यावेळी ती लोकांना इतकी आवडली नव्हती पण हळू हळू ती मालिका सर्वात जास्त टीआरपी देऊ लागली.

म्हणजे काय तर झी मराठी वरील ही सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. म्हणूनच काय तर या मालिकेच्या डायरेक्टर ने ही संपत आलेली मालिका आणखी कुठून वाढवायला मिळेल हा उद्योग सुरू केले आणि त्या डॉक्टरला फासावर न देता तो सुटून ही आला.

आणि आता ही मालिका पुढे अशीच चालू राहणार जोपर्यंत प्रेक्षक बोर होत नाहीत. याशिवाय या मालिकेत एक नवीन एन्ट्री होत आहे नवीन एन्ट्री या मालिकेसाठी काही नवीन नाही कारण ही मालिका सुरू झाल्यापासून यामधे कितीतरी अभिनेत्री आल्या आणि गेल्या. तर या मालिकेत नवीन अभिनेत्री येत आहे माधुरी पवार हिने यागोदर तुझ्यात जीव रंगला ही मालिका केली आहे.

Source Madhuri Pawar Social Handle

यागोदर ही भूमिका धनश्री काढगावकर हिने केली होती आणि माधुरी पवार ही सेम धनश्री सारखी दिसते त्यामुळे प्रेक्षक ही चकित झाले. माधुरी पवार ही टिक टॉक स्टार आहेच शिवाय ती लावणी उत्तम प्रकारे करते. सोशल मीडिया तसेच इन्स्टावर ही ती आपल्या लावण्याचे व्हिडिओ टाकत असते.

ती अप्सरा आली या शो मध्ये अंतिम फेरी विजेती आहे. माधुरीचा जन्म साताऱ्यात झाला एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असली तरी तिच्या आवडी निवडी छंद जोपासण्याची तिला मोकळीक होती. शाळेत असतानाच ती नृत्य करू लागली त्यामधूनच तिची कला प्रगत होत गेली. आणि आता ती आपल्याला देवमाणूस या मालिकेत दिसणार आहे बघुया तिचे हे कॅरेक्टर लोकांना किती पसंतीस पडते.

तुम्हाला देवमाणूस मालिकेत आलेल्या कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त भावला आम्हाला नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *