मनोरंजन

देवमाणूस कधी संपणार आणि कधी पकडला जाणार हा डॉक्टर? वाचा

देवमाणूस

तुम्हाला ती म्हण माहीतच असणार लांडगा आला रे आला तशीच काहीशी देवमाणूस या मालिकेची परिस्थिती आहे. हा डॉक्टर पकडला गेला तरी प्रेक्षकांना यावर विश्वास बसणार नाही त्यांना हे सुध्दा खोटेच वाटणार. साहजिकच आहे. या मालिकेतील डॉक्टर हा अनेक खून करतो. पण नेहमी वाचतो जितके खून खऱ्या डॉक्टर म्हणजे संतोष पोळ याने सुध्दा केले नसतील.

डॉ पोळ हा साताऱ्यातील डॉक्टर याच्यावर आधारित ही मालिका आहे. पण झी मराठीने तसा असल्याचा खुलासा केला नाही आहे. पण खरंच ही मालिका बघून या संतोष पोळ ला सुध्दा धक्का बसेल कारण इतके खून करूनही हा डॉक्टर एकदम सेफ राहतो.

यातील डॉक्टर म्हणजे अजित गायकवाड आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे दिव्या समजत नाही ही दिव्या नक्की एसीपी कशी झाली तिला त्या डॉक्टर वर अजिबात संशय कसा येत नाही. तिच्यापेक्षा ती मंजू बरी होती ती डॉक्टरचे सगळे चाळे ओळखून होती. पण ही दिव्या नुसते तोकडे कपडे घालून धावण्याचे काम करते खर काम तर त्या रणजित इन्स्पेक्टर आणि आता शिखरे करतोय.

ही दिव्या काही कामाची नाही एकतर तिला स्पष्ट मराठी बोलता येत नाही आणि डॉक्टर वर सर्व पुरावे आणि आता हातचे फींगर प्रिंट ही जुळले आहेत तरीही ती त्याला अरेस्ट करत नाही याचा अर्थ काय? म्हणे आणखी पुरावे गोळा करते आणि त्याला पकडते. याशिवाय नाम्याच ठीक आहे पण बज्या चा तर त्या डॉक्टर वर अतोनात विश्वास इतका विश्वास कोणी आपल्या भावावर ही करत नाही.

तस बोलायला गेलात तर वाड्यातील सर्वांचे काम उत्तम आहे. पण डिंपल तिच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर ला त्याच्या नीच कामा तही साथ देते हे पाहून वाईट वाटे. तिला इतकं कळत नाही की, हा डॉक्टर जर पकडला गेला तर आपलं काय होईल खर तर त्या डॉक्टर सोबत डिंपल ही सुद्धा तितकीच गुन्हेगार आहे.

तिने नेहमीच त्या डॉक्टरला असले वाईट कृत्य करण्यासाठी मदत केली आहे. त्यातल्या त्यात आजीची भूमिका पटण्यासारखी आहे तिचा त्या डॉक्टर ला पहिल्यापासून विरोध आहे आणि होता. बघुया पुढे काय पाहायला मिळते या मालिकेत. तुम्हाला काय वाटते आता मालिकेचा शेवट करावा का? तुमचं मत आम्हाला कळवा. फीचर इमेज क्रेडिट नुपर आर्ट गॅलरी

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *