मनोरंजन

भेटूया देवमाणूस मधील हवालदार शिखरे यांना बघुया त्याच्या बद्दल काही रंजक गोष्टी

देवमाणूस मालिका अगोदर लोकांना खूप आवडली पण आता त्या मालिकेने वेगळेच वळण घेतले आहे. त्यामुळे हे वळण लोकांना फारसे आवडलेले दिसत नाही. वाढवत गेलेल्या देवमाणूस या मालिकेत प्रसिध्दी मिळालेले एक कॅरेक्टर म्हणजे शिखरे हवालदार होय. हे कॅरेक्टर अगदी कमी वेळात लोकांना आवडू लागले.

एसीपी दिव्या हिच्या हाताखाली असणारे हवालदार शिखरे हे स्वभावाने राकट दाखवले असून त्यांचा अभिनय तर उत्तम आहे. या हवालदार साहेबांचे खरे नाव सत्यवान शिखरे असे आहे म्हणजेच मालिकेत ही त्यांचे नाव तेच आहे. याअगोदर हे स्वराज मार्केटिंग मध्ये काम करत होते. याशिवाय शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर येथून त्यांचं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

तसेच देवमाणूस मधील हे हवालदार शिखरे आणि त्यांच्यासोबत असणारी एसीपी दिव्या हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असतात. तसेच इंस्टाग्राम वर ही ॲक्टिव असतात. मध्यातरी त्यांचं लक्ष्मीकांत बेर्डे यांचे गाने खूप हिट झाले होते. “पोलिस वाल्या साईकल वाल्या बिरेक लाऊन थांब, टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसं र काम जाऊया डबल शिट र लांब लांब लांब” हे गाणं यामधे दोघांनी छान ॲक्टिंग केली होती.तसेच यात हवालदार शिखरे यांचा डांस ही लोकांना जास्त आवडला होता.

देवमाणूस मालिके बद्दल सध्यातरी लोकांच्या प्रतिक्रिया तितक्या चांगल्या नाही आहेत. मालिकेला कुठे कसे खेचायचे याकडेच डायरेक्टर डोळे लाऊन बसलाय पण जास्त ताणले तर तुटते हे त्यांना कदाचित त्यांना माहित नसेल. पण माधुरी पवारच्या येण्याने पाठ फिरवलेले काही प्रेक्षक पुन्हा एकदा मालिका पाहू लागले आहेत. तिचा अभिनय खूप लोकांना आवडत आहे. डॉक्टरला तोडीस तोड कुणी मिळाले आहे म्हणून प्रेक्षक खुश आहेत

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *