देवमाणूस येतोय असे ऐकूनच काही प्रेक्षक खुश झाले असतील तर काहींना ही मालिका नकोशी झाली असेल मध्यंतरी ही मालिका अत्यंत गाजली होती. झी मराठी वाहिनीला सर्वात जास्त टीआरपी देत होती. पण या मालिकेचा शेवट तितकासा चांगला झाला नाही त्यामुळे प्रेक्षक या नाराज आहेत. बोलायला गेलात तर मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन केले आहे आणि वेळ प्रसंगी शिव्याही खाल्या.
देवमाणूसच्या पहिल्या भागात देविसिंग म्हणजेच डॉक्टर अजित कुमार हॉस्पिटल मध्ये दाखल झालेला दाखवला आहे. तर देविसिंगच्या केलेल्या काळया कर्मांचा परदाफाश करण्याच्या हेतूने आलेली चंदा हीचा मृ*त्यू झालेला दाखवला आहे. देवमाणूस या मालिकेचा प्रोमो आपल्याला सध्या तरी झी मराठीवर पाहायला मिळालेला आहे. या प्रोमो मध्ये डॉक्टर अजित कुमार देव याची पाटी हटवण्यात आलेली आहे.

त्यामुळे या मालिकेचा नेमका हेतू काय आहे अजितकुमार देव च्या जागी दुसरा कोणी असेल का? शिवाय यात असणारा अजित कुमार देव म्हणजे किरण गायकवाड याची भूमिका नकारात्मक असूनही प्रेक्षकांना खूप आवडली होती त्यामुळे यात पुढे काय दाखवणार आहे हे बघण्यात इंटरेस्टिंग आहे. यात बाबू, सरु आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा हे पात्र पाहायला मिळतील अशी आशा आहे.
ही कथा साताऱ्यातील एका खेडेगावातील आहे त्यात एक डॉक्टर येतो आणि लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडतो आणि त्यांच्या जीवाशी खेळत असतो. बघुया पुढे काय होत आहे खरोखर अजित कुमार देव म्हणजे देविसिंगला त्याच्या केलेल्या कृत्या बद्दल शिक्षा मिळते का ? अजून काही दाखवायचे आहे. ही मालिका डिसेंबर मध्ये पाहायला मिळणार आहे शिवाय ती परत आलीय ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे तिच्या जागी देवमाणूस २ मालिका पाहायला मिळेल.
एका फॅन पेज ने देवमाणूस २ चे पोस्टर सोशल मीडियावर टाकून ही मालिका डिसेंबर मध्ये येणार असल्याची ही माहिती दिली आहे. देवमाणूस २ ही मालिका तुम्हाला पाहायला आवडेल का कॉमेंट करून नक्की सांगा.