हेल्थ

टोमॅटो सॉस किंवा केचअप यांचा आपल्या आहारात अतिरेक असणे वाईटच वाचा कसे

आपल्या घरात जास्त करून लहान मुलांना टोमॅटो सॉस आवडतो. मग तो ब्रेड सोबत असो किंवा चपाती सोबत किंवा अन्य कोणत्याही पदार्थ सोबत असो त्यांची पहिली आवड म्हणजे टोमॅटो सॉस होय. त्यांनाही आपण नाही म्हणून सांगू शकत नाही. हेच नाही तर सध्याच्या काळात फास्ट फूड खाण्याची क्रेझ वाढली आहे आणि त्यात मोठी माणसे ही मागे नाहीत या फास्ट फूड सोबत टोमॅटो सॉस हा आलाच.

आपल्या फ्रिज मध्ये या टोमॅटो सॉसची बॉटल किंवा पाउच हा असतोच मग मुलांनी हट्ट केला की आपण तो लगेच देणार पण या टोमॅटो सॉसचा अतिरेक हा वाईटच. तर हा टोमॅटो सॉस बनवताना त्यात अनेक प्रकारची रसायने असतात याशिवाय केमिकल्स ही असतात ती आपल्या शरीरातील घातक असतात.

हा टोमॅटो सॉस सतत खाल्याने एसिडिटीचा त्रास होऊ शकतो. या या सॉसमध्ये जास्त प्रमाणात सायट्रिक असिड असते त्यामुळे छातीत जळजळ, अपचन असे आजार होऊ शकतात. टोमॅटो सॉसमध्ये भरपूर प्रमाणत साखर असते त्यामुळे तुमची चरबी वाढून स्थूलपणा वाढतो.

टोमॅटो केच अप मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणत वाढणारे घटक असतात त्यामुळे तुम्हाला मुतखडा होऊ शकतो. याशिवाय किडनीचे आजार ही उद्भवू शकतात. काहीजणांना रंगाची अलर्जी असते त्यामुळे टोमॅटो सॉस साठी वापरले जाणारे फूड कलर तुम्हाला सर्दी खोकला सारखे आजार देऊ शकतात.

टोमॅटो सॉस कधीतरी खाणे चुकीचे नाही पण नेहमीच आणि रोजच्या आहारात त्याचा समावेश असणे हे तुमच्या शरीरा साठी घातक आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *