मनोरंजन

मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री माऊ बद्दल जाणून घ्या

स्टार प्रवाह वरील बहुतेक मालिका या प्रेक्षकांचे आकर्षण बनल्या आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे मुलगी झाली हो. ही मालिका ही तितकीच लोकप्रिय आहे. त्यातील सर्वाची आवडती अभिनेत्री म्हणजे माऊ तीच खर नाव आहे दिव्या सुभाष पूगावकर. तिला एक भाऊ आहे त्याच नाव विवेक आहे.

ही दिव्या सध्या मुंबई मध्ये स्थाईक आहे, पण तिचा मूळ गाव माणगाव आहे. तिचा जन्म 21 जुलै 1996 मधे झाला आहे. शिवाय तिचे सर्व शिक्षण ही मुंबई मध्येच झाले. तिला अभिनय करण्यासोबतच मोडलींग आणि डान्सिंगची खूप आवड आहे. स्टार प्रवाह वरील प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर विठू माउली या मालिकेमध्ये तिने चंद्रभागा ही भूमिका केली होती.

याशिवाय मी मराठी वरील एक शो कोकणची सुकन्या याची तू विजेती ठरली होती. “प्रेम तुझं रंग कसा” याशिवाय तिने शॉर्ट फिल्म “इट्स माय डुटी” मधे डेबू केला आहे. शिवाय दुसरी शॉर्ट फिल्म म्हणजे दृष्टी ही केली आहे. याशिवाय तिचा नखरा तुझा हे गाणं ही यूट्यूब आहे. काही वायरल गोष्टी वरून असे निदर्शनास आले आहे की तिचा बॉयफ्रेंड ही आहे.

त्याचे नाव अक्षय घरत आहे. तो बॉडी बिल्डर याशिवाय प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. पण तिच्याकडून ह्या गोष्टीची अजून काही पूर्तता करण्यात आली नाहीये. असे काही केल्यास आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू. तुम्हाला मुलगी झाली ही ही मालिका आवडते का नाही? हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *