मनोरंजन

दृष्यम २ प्रदर्शित होणार या महिन्यात, असतील हे कलाकार

दृष्यम चित्रपट कुणी पाहिला नसेल तर नवलच.. अजय देवगणच्या या सिनेमाने अनेक चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली होती. आता दृष्यम चाहते आणि अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दृष्यम २ लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा आहे.

खर तर हा चित्रपट मल्याळम भाषेतील डब चित्रपट आहे. मल्याळम भाषेतील हा सिनेमा १०१३ ला प्रदर्शित झाला होता नंतर हिंदी भाषेत २०१५ ला या सिनेमाचे प्रदर्शन करण्यात आले. सिनेमात अजय देवगण तर असेलच त्याच्या सोबत श्रिया सरण आणि तब्बू हे कलाकार सुध्दा पाहायला मिळतील. त्याच बरोबर इशिता दत्ता, रजत कपूर हे ही कलाकार पाहायला मिळतील.

ही आनंदाची बातमी स्वतः अजय देवगण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून चाहत्यांना दिली. त्याने चित्रपटाचा फोटो शेअर केला आहे. पोस्ट करत म्हटले, दृष्यम २ चित्रपटाच्या शुट्टिंगला सुरुवात याशिवाय ” विजय त्याच्या कुटुंबाला वाचऊ शकेल का अस लिहले आहे. आणि तब्बूला टॅग केले आहे.

या चित्रपट मध्येही अजय देवगण विजयची भूमिका करताना दिसणार आहे. हा चित्रपट ही पहिल्या दृष्यम सारखाच सस्पेन्स आणि थ्रिलर असणार आहे. त्यावेळी दृष्यम ने १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाचे शुटिंग मुंबई तसेच गोव्याला करण्यात येणार आहे. हा सिनेमा डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे.

दृष्यमच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन हे निशिकांत कामत यांनी केले होते पण आता त्यांचे निधन झाल्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक हे करणार आहेत. त्यामुळे बघायला आवडेल की जबाबदारी ते कशा पद्धतीने पार पडणार आहेत. प्रेक्षकांना पहिल्या दृष्यम सारखाच दृष्यम २ पाहण्यात मजा येईल का?

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *