आठवड्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे परिपूर्ण नाश्ता आहे. कृती केवळ आरोग्यासाठी उपयुक्त नाही तर बनवणेही अगदी सोपे आहे, आणि तितकीच पौष्टिक देखिल. आपल्या वेळेची काही मिनिटे लागतात, ऑमलेटची पूर्व तयारी करण्यासाठी आणि एक चपाती.
साहित्य: १ – होममेड प्लेन चपाती (रोटी), १ – अंडे, मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची
टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. टोमॅटो केचअप (ऐच्छिक), श्रेडेड चीज (ऐच्छिक).
पद्धत: होममेड चपाती घ्या. बाजुला छोटे छोटे कट करा आणि एक पॉकेट तयार करा. आणि आता आपण आमलेट मिश्रण बनवून घेऊ. अंडे फोडून त्यात मीठ घाला. पॅन गरम करा. अंडे नीट ढवळून घ्यावे, त्यात चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा.
पॅनमध्ये थोडे तेल घाला. आता पॅनवर चपाती घाला, एका बाजूने ते थोडे गरम होऊ द्या. एका भांड्यात अंड्याचे मिश्रण घ्या. यापूर्वी तुम्ही जेथे पॉकेट कट केले आहेत त्यात आता हळूहळू अंड्याचे मिश्रण घालायला सुरवात करा. वरती काही तेल घाला. दोन्ही बाजूंनी शिजवा. आणि तयार झाली तुमची अंडा चपाती.
टीप: अंड्याचे मिश्रण चापतीमधे व्यवस्थित घाला. आपल्या आवडीच्या केचअप किंवा चटणीबरोबर अंडा चपाती सर्व्ह करा.