बहुतेक जण अंडा खातात पण त्यांना हे माहीत नसते त्यात कोणते गुणधर्म आहेत ते शिवाय काहीजण फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात पण पिवळ्या भागात ही तितकेच भरपूर पौष्टीक घटक असतात, हे त्यांना माहीत नसते. या जगात प्रत्येक जण आपल्याला आवडेल त्या प्रकारे अंडे करू खात असतो. तुम्हाला माहीत आहे का अंडा हा एकप्रकारे प्रोटीनचा खजाना आहे.
त्याच बरोबर अंड्यातून प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक हे सुध्दा मुबलक प्रमाणात शरीराला मिळते शिवाय अंडे खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. आता अंड्याचे मधील बलक किती महत्त्वाचे आहे ते पाहूया

अंड्याच्या मधल्या बळकात व्हिटॅमिन्स, क्षार, लोह, कोलीन, ऊर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२, फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२, इत्यादी घटक मिळतात.
हाडे मजबूत होतात – अंडा खाल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतात आणि हेच व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करतात हेच कॅल्शियम अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ्या भागात जास्त असते. शिवाय त्यावुळे तुमची त्वचा तजेलदार राहते शिवाय डोळे निरोगी राहतात.
अंड्याच्या पिवळ्या बलकामध कोलीन हे घटक आढळते त्याच्यामुळे मेंदूची विकास चांगल्या प्रकारे होतो. अंड्यामध्ये असंते अमिनो आम्ल यामुळे तुमचे हृदय मजबूत राहते. अंडे हा प्रोटीन चा एक उत्तम स्रोत आहे हे तुम्हाला माहीतच आहे हे प्रोटीन शरीराला मिळल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात.
पण तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर अंड्याचा फक्त पांढरा भाग खा त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. अंड्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे तुमची दृष्टी मजबूत होते तसेच डोळ्याच्या अनेक समस्या ही दूर होतात.