मनोरंजन

कधीनाकधी कुठेनाकुठे प्रेमभंग झाला असतो त्यांच्यासाठी Exit

exit

२०२० ची सुरुवात “दोन कटिंग” ने दणक्यात केल्यानंतर नंतर फिलमबाझ फिल्म कंपनी आपल्यासाठी  काय घेऊन येत आहे  ह्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती . त्यातच त्यांनी एक्सिटची अनांउन्समेन्ट केली आणि प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच  वाढवली . एक्सिटच्या पोस्टर मधला एक्स ला हायलाईटेड दाखवणं म्हणजे नक्कीच हि कथा एक्स बद्दलची असावी असं लक्षात येत.

आयुष्याच्या वाटेवर बहुतांश लोकांचा  कधीनाकधी कुठेनाकुठे प्रेमभंग झाला असतो कधी आपल्या बाजूने , कधी समोरच्याच्या बदलण्यामुळे . काही लोक त्यातून बाहेर पडतात काही त्यातच अडकून पडतात . अश्यातच ज्या व्यक्तीवर आपण निस्सीमपणे प्रेम केल आहे तो व्यक्ती आपल्या आयुष्यात परत आला तर काय ? ह्याबद्दलची हि गोष्ट  आहे.

असं रायटर – डायरेक्टर कृणाल राणे यांनी आमच्या टीम ला सांगितलं. महत्वाची गोष्ट म्हणजे फिलमबाझ फिल्म कंपनी ने ह्यावेळी प्रेक्षकांसाठी हि गोष्ट हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही. भाषांमधून आणली आहे … हिंदीमध्ये, हिंदी सिरीयल  भाकरवाडी फेम अक्षीता मुदगल आणि फिलमबाझचा लाडका अक्षय केळकर बघायला मिळतील तर मराठीत ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ फेम “सायली साळुंखे” अक्षयच्या जोडीने पाहायला मिळेल .

४ तारखेला हिंदीमध्ये आपल्या चॅनेलवर आणि पुढे ott प्लॅटफॉर्म वर मराठी एक्सिट आपल्याला बघायला  मिळेल .

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *