बातमी

जाणून घ्या २०२१ मधे घडणाऱ्या काही घडामोडी

जसे २०२० मधे खूप गोष्टी घडल्या, काही चांगल्या काही वाईट. काहींचा फायदा झाला तर काही लोकांचे खूप मोठे नुकसान. २०२० मधे देखिल खूप अशा घडामोडी झाल्या ज्या सकारात्मक होत्या, कुठेतरी आशेचा किरण दाखवून गेल्या.

मात्र २०२१ ची सुरुवात आपण चांगल्या बातम्यांनी आणि सकारात्मकतेने करू. या ज्या काही घडामोडी आहेत त्या खरच सामान्य जनतेसाठी आणि देशासाठी फायदेशीर आहेत की ते फक्त एक मृगजळ आहे हे आपल्याला लवकरच कळेल.

टेसला ही एक अमेरिकेची कंपनी आहे जी विद्युत वाहनांसाठी ओळखली जाते. ही कंपनी २०२१ मधे भारतात प्रवेश करणार आहे आणि कदाचित टेसला या कंपनीचे उत्पादन देखिल भारतातच होईल. उत्पादनाबाबत अजून काही ठाम माहीती समोर आली नाही.

सगळ्यात महत्वाची बातमी आहे, कोरोणाच्या लसीसंबंधीची. भारतामधे सिरम इन्स्टिट्यूट ने कॉरोनाच्या लसीचे ४० ते ५० दशलक्ष इतके डोस आधीच तयार करून ठेवले आहेत. मात्र या लसींचे वाटप टप्पा टप्प्याने करण्यात येणार आहे.

अदानी पोर्ट्स भारतातील सर्वात मोठे खाजगी मल्टी-पोर्ट ऑपरेटर आहे, अदानी पोर्ट्स हे अदानी ग्रुप्स चा एक भाग आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही दुसरी अशी कंपनी आहे जी एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचली आहे. आणि पहिली कंपनी आहे मुकेश अंबानी यांची.

याबाबतचे तुमचे मत काय आहे, हा फक्त गुजराती व्यावसायिक दृष्टिकोनाचा परिणाम आहे की, अनुकूल राजकीय संबंधांचा यामागे काही हात आहे. हे सगळे देखिल कधी ना कधी समोर येईलच. पण तोपर्यंत आपला दृष्टिकोन आपण सकारात्मकच ठेऊ.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *