मनोरंजन

प्रथमच आगरी पात्राची मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय “बाबू”

इतिहास सांगतो की आगरी समाज मुंबईचा खरा भूमिपुत्र आहे. आगार म्हणजे भात पिकवणारे खाचर अशा आगरात काम करणारे म्हणजेच आगरी, अशी आगरी लोकांनी जुनी ओळख. पण बदलत्या काळानुसार आगरी लोक बदलली आहेत. आगरी लोकांची खासियत म्हणजे गळ्यात सोनं आणि तोंडात आगरी भाषेचा गोडवा. तुमच्या मित्र परिवारात एकतरी आगरी मित्र असेल या बद्दल शंकाच नाही कारण मैत्री जिवासारखी जपणारा हा आगरी समाज.

आगरी लोकांच्या हळदी, लग्नात कुणीही हुंडा घेत नाही, यांचे आई वडील कधीच तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाहीत, आई एकवीरेचे भक्त अशी या आगरी लोकांची खास ओळख. सध्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असे आगऱ्यांची मागणी आहे. म्हणून सध्या आगरी हे नाव संपूर्ण जगाला कळलं आहे.

पण या समाजाचे रूप सिने सृष्टीत हवे तसे कशी दाखवलेच नाही. कधी रिक्षावाला तरी कधी भाई गुं*ड असेच आगरी लोकांची प्रतिमा आजवर तुम्ही सिनेमात पाहिली असेल. खरतर ही खूप दुःखद बाब आहे कारण मुळात आगरी समाज असा नाहीच आहे. खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ अशी त्यांची ओळख आहे.

पण आता हे चित्र बदलणार आहे कारण प्रथमच आगरी पात्राची मुख्य भूमिका असलेला चित्रपट येतोय. या सिनेमाचे नाव बाबू असे असणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.अभिनेता अंकित मोहन बाबू या पात्राची भूमिका साकारतोय. एक आगरी मुलगा कसे अन्यायाला वाचा फोडतो असे चित्रपटाचे कथानक असेल.

या सिनेमा द्वारे आगरी भाषेचा गोडवा तुम्हाला पाहता येईल. टिझर सुरू होताच एक लाईन समोर येते, आगऱ्याची दोस्ती लय भारी पण आगऱ्याची दुष्मनी खल्ल्यास. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन मयूर शिंदे यांनी केलं आहे तर बाबू भोईर यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. सिनेमात तुम्हाला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. अभिनेत्री नेहा महाजन सुद्धा मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल.

सिनेमा कधी प्रदर्शित होईल याची माहिती समोर आली नाहीये. पण लवकरच सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी येईल असे निर्मात्यांनी म्हटलं आहे. हा अँक्शनपट सिनेमा असेल त्यात आगरी कोळी भाषेचा तडका, त्यामुळे सिनेमा रंजक असेल याबाबत काही शंकाच नाही. सिनेमाचे टीझर पहण्यासाठी कमेंट मध्ये दिला आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *