मनोरंजन

या कारणाने आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती सध्या दिसत नाही

Arundhati

अरुंधती हे या मालिकेतील महत्वाचे कॅरेक्टर आहे त्यामुळे एक दिवस जरी ते दिसले नाही तरी वेगळंच वाटत. आता अनेक दिवस झाले पण अरुंधती या मालिकेत दिसत नाही. पण का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडणे सहाजिकच आहे. अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुळकर पण प्रेक्षक तिला आता अरुंधती या नावानेच ओळखतात.

तिने सध्या ब्रेक घेतला का? पण का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहेच. तर सध्या तिची तब्बेत बरी नाही त्यामुळे तिने थोडा ब्रेक घेतला आहे असे कळले आहे. त्यामुळे थोडा आराम केल्याने तिला पहिल्यासारखे बर वाटेल. आणि ती पुन्हा या मालिकेत पाहायला मिळेल.

सध्या अभी आणि अनघाचे लग्न झालेले दाखवले आहे. घरातील सर्व जबाबदारी अनघा घेते पण तरीही अरुंधती ची कमतरता जाणवतेय. अनघा आणि तिची आई या दोघींच्या अपघात झाल्याचे या मालिकेत दाखवले आहे. पण आता पुढे काय होईल याची उस्तूकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.

Source Madhurani prabhulkar social handle

सध्या फक्त एकच प्रकरण या मालिकेत दाखवले जात आहे ते पाहून प्रेक्षक ही कदाचित बोर झाले असतील ते म्हणजे यश ने अनघाच्या नवऱ्याला मारायला नको होते. पण अजून किती दिवस हाच मुद्दा घेऊन तुम्ही भांडण दाखवणार आहात तेच तेच पाहून मालिका कंटाळवाणी झाली आहे. काहीतरी नवीन दाखवा.

अरुंधती ला लवकर यातून बरं वाटू दे आणि ती पुन्हा या मालिकेत यावी यासाठी तिला शुभेच्छा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *