प्रचंड लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे सैराट तुम्हाला माहीतच असेल यातील प्रत्येक कलाकाराने आपली भुमिका चोख बजावली होती. खरं ते यातील सगळे कलाकार हे नवीन कलाकार होते पण त्यांनी केलेला अभिनय वाखडण्या जोगा होता. त्यातील एक लोकांच्या पसंतीस उतरलेली जोडी म्हणजे सल्या आणि लंगड्या म्हणजेच अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे.
सैराट मधील पर्श्या आणि आर्ची यांना जरी लोकांनी पसंती दर्शवली असली तरीही त्यांच्या बरोबर या दोघांची भूमिका ही लोकांना प्रचंड आवडली होती. त्यांची अर्धवट राहिलेली प्रेमकहाणी, कॉमेडी, कॉलेज लाईफ त्यांची गरिबी सर्व काही प्रेक्षकांना मोहून टाकते.
काही सिनेमे असे असतात जे फक्त मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांच्या नावाने ओळखले जात नाहीत तर सह कलाकारामुळे सुद्धा तितकेच ओळखतात. असच सिनेमा म्हणजे सैराट. ह्या सिनेमातील प्रत्येक पात्राने जीव ओतून काम केलं होतं म्हणूनच हा सिनेमा लोकांचा पसंतीस पडला. खास करून परशा चे मित्र सल्या आणि लंगड्या लोकांना खूप जास्त भावले.
आता ही जोडी पुन्हा एकदा येत आहे आपल्या भेटीला म्हणजे एक नवीन मराठी सिनेमात ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘फ्री हिट दणका’ सुनील मगरे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जशी सैराट मध्ये या जोडीने आपली मैत्री दाखवली त्याचप्रमाणे या चित्रपट मध्ये ही मैत्रीची वेगळी भाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे.