हेल्थ

माशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे

गाभोळी

मंडळी आपण जास्त करून मासे खातो पण या माशांची गाभोळी खाल्याने अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. काही लोकांना हे खाणे आवडत नसेलही पण जर गाभोळी खाल्ल्याने इतके फायदे मिळणार असतील तर ती खाणे आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे.

तुम्ही पहिलेच असेल माशाच्या अंड्याचा रंग हा पिवळा असतो आणि हे अंडी देण्याचा मौसम म्हणजे प्रजोत्पादना चा काळ म्हणजे पावसाळी जास्त असतो म्हणजेच आपला मराठी श्रावण महिना होय. इतर दिवशी ही प्रजोत्पादना चा काळ असतो पण तो कमी असतो. या त ओमेगा 3 फॅट तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12 तसेच मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शिअम हे घटक आढळतात.

या माशांच्या गाभोळी मध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात आढळतात. हे व्हिटॅमिन आपल्या डोळ्यांसाठी तसेच व्हिटॅमिन बी 12 केसांसाठी व आपल्या नखांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर नक्कीच गाभोळी खा या गाभोळी मध्ये मोठ्या प्रमाणत मेटाबॉलीझम आढळते. ज्यामुळे तुमचे वाढणारे वजन आपोआप कमी होऊ लागते.

गाभोळी खाल्याने तुमचे रक्त नेहमी साफ आणि स्वच्छ राहते याशिवाय रक्त कमी असेल तर त्याची वाढ होते. वयोमानानुसार शरीराच्या हाडांमध्ये नेहमी कमजोरी किंवा ठिसूळ पणा आलेला दिसतो अशा वेळी माशाच्या अंड्यात असणारे कॅल्शिअम उपयोगी पडते. त्याचप्रमाणे कॅल्शिअम हे आपल्या दातांसाठी हि अत्यंत उपयोगी आहे.

या माशांच्या गाभोळी मध्ये अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे ओमेगा 3 फॅटी अॅसिड पाहिले जाते जे आपल्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिवाय ह्रदयच्या आजारांवर ही ओमेगा 3 फॅटी अॅसिड आवश्यक आहे आणि तुमच्या स्किन साठी हि अत्यंत आवश्यक असे हे घटक आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *