विचारधारा

गटारी अमावस्या म्हणजे काय?

गटारी म्हणजे काय

बहुतेक जणांना गटारी अमावस्या म्हणजे नक्की काय हेच माहित नसेल. पाहायला गेलात तर आताच्या पिढीला गटारी म्हणजे फक्त मटण, चिकन आणि मासे यांचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांचा फडशा पाडणे होय. शिवाय त्याचबरोबर दारू, बियर यांचे सेवन आणि मग अख्खा दिवस आमावशेच्या नावाने धुडगूस घालायचा. पण गटारी अमावशा म्हणजे हे सगळं आहे का ?

आता बघुया नक्की गटारी अमावस्या म्हणजे काय. खर तर ही दीप अमावशा होय या अमावशेच्या रात्री दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदरची ही रात्र असते याला दीप अमावशा असे म्हणतात. म्हणजेच काय तर अंधारातून तुम्हाला उजेडात नेणारा दिवस होय. आता उद्याच्या श्रावणात अनेक सण येतील त्या सनांचा स्वागत करणारा हा दिवस होय.

खरं बघायला गेलात तर मराठी माणसाचा हा सण आहे जसा 31 डिसेंबर असतो ना तसा. तस म्हणायला गेलात तर आपले देव आणि शास्त्र आपल्याला दारू पी आणि सण साजरा कर असे कधीच सांगत नाही. पण आपल्या प्रथा आणि सनच असे आलेत की, त्यांची आपल्याला सवयच झाली आहे. म्हणजेच काय तर आदल्या दिवशी संक्रात गोडाचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे मटण, मच्छी शिवाय आदल्या दिवशी होळी म्हणजे गोडाचे जेवण.

दुसऱ्या दिवशी दुळवड म्हणजे नॉनव्हेज तसच काहीस दुसऱ्या दिवशी श्रावण आहे मग आदल्या दिवशी मटण मच्छी चा फडशा असाच काही संदर्भ लागला असेल. पण गटारी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी आषाढी अमावस्या होय. हिला दिव्यांची अमावस्या म्हणतात घरात असणारे प्रत्येक दिवे, कंदील, निरंजन, समई स्वच्छ घासून ते लाऊन किंवा गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्यांची देवापुढे ठेऊन पूजा केली जाते.

शिवाय गोडाच नैवेद्य दाखवले जाते.  दिव्यांची पूजा करून आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा ते ही मटण मच्छी खाऊन आणि दारू पिऊन गटारात लोळून कसेही करा पण गटारी अमावशा साजरी करा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *