मनोरंजन

गौरव मोरे बद्दल ह्या गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील

गौरव मोरे त्याचि ओलख म्हणजे पवई फिल्टर पाडा, मुंबई येथील राहणारा एक साधा सरळ कलाकार सध्या चालू असलेला कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधे कमाल कॉमेडी करताना दिसतो. तो आपले काम करत असताना स्वतला पूर्णपणे त्यात झोकून देतो तसे यातील बहुतेक कलाकार हे उत्तमच आहेत .

मराठी नाटक, तसेच मालिका याशिवाय काही हिंदी चित्रपटांमध्येही तो आपल्याला दिसून आला आहे. ह्यात संजू सिनेमात त्याच्या छोट्याश्या रोल ने सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या होत्या. म्हणजेच काय तर विनोदी भूमिका करण्यासोबतच त्याने गंभीर भूमिका ही उत्तम पणे पार पडल्या आहेत.

कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत काम करता करता त्याला जळू बाई हळू या प्रसाद खांडेकरच्या सोबत नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रसाद खांडेकरच्या सोबत झालेल्या मैत्रीने प्रसाद खांडेकर ने लिहलेल्या स्कीट मध्ये आणि नाटकात तो काम करू लागला.

त्याची पहिली मालिका म्हणजे माझिया प्रियाला प्रीत कळेना यातून त्याने उत्तम रित्या विनोदी भूमिका केली होती. सध्या तो वनिता खरात आणि ओंकार भोजने सोबत कॉमेडी स्कीट करत आहेत आणि लोकांना हसवण्याचे काम करत आहे तसेच संजू या चित्रपट मधे गौरव याने रणबीर कपूर सोबत काम केले आहे त्याची त्याला खूप चांगली दाद मिळाली आहे. त्याचप्रमाणे कामयाब, झोया फॅक्टर ज्यामधे ही त्याची भूमिका उत्तम आहे.

विकी वेलिंगकर ह्या मराठी चित्रपटात तो शेवटचा आपल्याला दिसला होता. त्या अगोदर खरी ओळख त्याला श्रीकांत पाटील मुख्य भूमिका असलेला गावठी सिनेमातून मिळाली. तिथूनच त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. आता आपल्याला तो प्रत्येक स्किट मध्ये मनमुराद हसवतो. स्वतवर पंच काढत प्रेक्षकांना हसवणे सर्वानाच नाही जमत. पण हेच तर टॅलेंट गौरव मोरे कडे आहे.

Previous ArticleNext Article

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *