जेनेलिया (Genelia D’Souza Deshmukh) हे नाव खूप तरुणाच्या हृदयाचे ठोके धड धड करायला पुरेसे आहे. एक काळ असा होता जेव्हा जेनेलिया डिसूझा हा चेहरा पाहून अनेक तरुण घायाळ व्हायचे. अनेक मुलांचा तर क्रश होती सर्वांची लाडकी जेनी. अजूनही आहेच म्हणा पण काही वर्षांपासून जेनेलिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे.
रितेश देशमुख सोबत लग्न झाल्यानंतर जेनेलिया आपल्या संसारात रमली. सिने सृष्टीला तिने राम राम ठोकला असला तरी निर्मातिच्या भूमिकेत तिला आपण पाहिले आहे. माऊली आणि फास्टर फेणे ह्या सिनेमाची तिने निर्मिती केली. एवढेच काय तर लय भारी, माऊली ह्या सारख्या चित्रपटात तिने स्पेशल परफॉर्मन्स सुद्धा दिला होता.

सलमान खानच्या जय हो सिनेमात ती आपल्याला शेवटचे अभिनय करताना दिसली. आपला संसार आणि मुलांचे संगोपन तिने योग्यरीत्या केलं. पण आता मुलं मोठी झाल्यानंतर तिला पुन्हा एकदा पडद्यावर पदार्पण करायचे आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने असे म्हटले की मला पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करायला आवडेल.
जर योग्य भूमिका माझ्याकडे आली तर नक्कीच मी पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करेल. तिच्या ह्या वक्तव्यामुळे अनेकांचे लक्ष तिच्या येणाऱ्या प्रोजेक्ट कडे लागले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ती आणखी एका गोष्टी मुळे चर्चेत आली होती.
तिने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट खाली एक युवकाने अशी कमेंट केली होती की “जाने तू या जाने ना हा सिनेमा जेव्हा पण पाहतो तेव्हा वाटतं की बहीण असावी तर आदिती तुझ्यासारखी” ह्याच पोस्टला रितेश देशमुख ह्याने रिप्लाय करत असे म्हटले की भाऊ राहणे योग्य आहे कारण प्रियकर आणि नवरा ह्या जागा मी आधीच भरून काढल्या आहेत.
काही लोकांनी ह्या रिप्लाय मुळे रितेशचा हजरजबाबी पणा खूप जास्त भावला तर काहींना हे त्याचे असे बोलणे खटकले. पण काहींनी मज्जा मस्ती म्हणून हा विषय टाळून नेला. पण सर्वांना मात्र जेनेलिया वहिनी चे पुन्हा एकदा पडद्यावर येण्याची आतुरता लागून राहिली आहे.