संपूर्ण महाराष्ट्राची वहिनी म्हणून ज्या आभिनेत्रीची ओळख आहे अशी जिनीलिया डिसूझा देशमुख तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाची आहे. एकेकाळी आपल्या अभिनयाने साऊथ इंडस्ट्री मध्ये आपलं एक वेगळं नाव तिने कमावले होते. बॉलिवूड मध्ये सुद्धा तुझे मेरी कसम या सिनेमातून तिने रितेश देशमुख सोबत बॉलिवूड मध्ये पदार्पण केला होते.
पुढे जाऊन या दोघांची केमिस्ट्री एवढी चांगली जमून आली की दोघांनी लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर जिनीलिया सिने सृष्टीपासून लांब राहिली. तिने आपला पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला दिला. यातच तिने पती रितेश देशमुख सोबत मुंबई फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. या कंपनी अंतर्गत अनेक सिनेमाची त्यांनी निर्मिती केली.
निर्मातीच्या रुपात तर ती आपल्याला दिसली पण सिनेमात अभिनय करताना मात्र कधीच समोर आली नाही. तिने सलमान खानच्या जय हो सिनेमात शेवटचे काम केलं होतं तर मराठी मध्ये लय भारी आणि माऊली सिनेमात गाण्यात ती चाहत्यांच्या समोर आली होती. पण सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. आपले वेगवेगळे व्हिडिओ ती पोस्ट करत असते.
पण आज तिने एक पोस्ट करत सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने पोस्ट करत सांगितले की मी पुन्हा एकदा तब्बल दहा वर्षाने सिनेमातून पदार्पण करतेय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा मराठी सिनेमा आहे. आपण जिनीलियाला मराठी बोलताना खूप कमी वेळा पाहिले आहे त्यामुळे हा सिनेमा लोकांना नक्कीच पाहायला आवडेल.

सिनेमाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख हे करत आहेत. वेड असे सिनेमाचे नाव असून सिनेमाचे संगीत अजय अतुल करणार आहेत. सिनेमात जिनीलिया सोबत जिया शंकर आणि रितेश देशमुख सुद्धा असणार आहे. हा सिनेमा २२ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या भेटीला येईल. हा सिनेमा मराठी पाठोपाठ इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.
जिनीलिया ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे याबद्दल शंका नाही पण वेड सिनेमात ती आपला अभिनय कसा दर्शवते हे चाहत्यांना पाहणे रंजक असेल. तुम्हाला आवडेल का जिनीलिया चा हा मराठमोळा सिनेमा? आम्हाला नक्की कळवा.