गुळवेल हिला आयुर्वेद मध्ये महत्वाचे स्थान आहे. डेंग्यू या तापामध्ये गुळवेल या वेळीच अत्यंत फायदेशीर उपयोग होताना दिसतो. गूळ वेलीच्या काड्याचे सेवन योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात करणे आवश्यक आहे तर या वेळीच फायदा तुम्हाला होऊ शकते गुळवेलीचा काढा घेतल्याने कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होत नाही. ही वनस्पती डेंग्यू या आजारावर रामबाण आहे.
हे औषध घेतल्याने डेंग्यू झालेले रुग्ण लवकर बरे झालेले आहेत. डेंग्यू मुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटले्स कमी होताना दिसतात. पण गुलवेळीचे सेवन यावेळी लाभदायक ठरते.
गुळवेल ही तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यात एकदम उत्कृष्ट असे साधन आहे. ज्यावेळी तुम्हाला कळते तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा वेळी तुम्ही रोज गुलवेली च काढा घेत जा यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
गुळवेल ही दिवसाला एका विशिष्ठ मर्यादेत सेवन करायला हवी. तिचे सेवन दिवसातून जास्तीत जास्त १ ग्राम इतकेच करायला हवे. त्यांना पचन क्रियेचा त्रास आहे अशांनी गुळवेल सेवन करू नये.
ज्या व्यक्तींना उच्च रक्त दाब आहे अशांनी ही डॉक्टरांच्या सल्ल्याने या गुळवेल चे सेवन करावे.
आवळा आणि गुळवेल या दोघांचा एकत्र रस घेतल्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. चस्मा लागलेला असेल तर त्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.
कोरोणाचा प्रभाव वाढत आहे याच्यापासून तुम्ही स्वतच्या रक्षण कसे करू शकता तर यासाठी थोडी गुळवेल, तुळशीची पाने, गवती चहा,दालचिनी, मिरी, लवंग, तेजपत्ता यांचा काढा पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा रोज सकाळी एक कप हा काढा प्या.
गुळवेलची पावडर आणि गोळ्या ही तुम्हाला उपलब्ध मिळतील त्या ही घेऊ शकता. एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात
गुळवेलचे सेवन केल्याने पोटाचे आजार दूर पळून जातात त्यात वारंवार पोटात होणारा गॅस यापासून मुक्त मिळते तसेच बद्धकोष्ठ या आजारापासून ही रक्षण होते.
गुळवेल चा काढा घेतल्यामुळे तुम्ही मानसिक ताण तणाव पासून दूर राहता. पंडुरोग किंवा रक्तक्षय झाला असल्यास अशा वेळी गुळवेल चे सेवन हितकारक ठरते.
मधुमेह असणाऱ्या साठी गुळवेल ही अत्यंत उपयोगी अशी वनस्पती आहे मधुमेह या आजारात होणारे अनेक प्रकारचा त्रास ही गुळवेल घेतल्यामुळे कमी होतो.