मनोरंजन

हार्दिक पांड्या झाला बाबा

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्राम पेजवर आज एक पोस्ट करत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. त्याची पत्नी नताशा हिने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी सोशल मीडियावर येताच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिक क्रिकेट व्यतिरिक्त नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. मग ते कॉफी विथ करण रिऍलिटी शो मधील वाद असो किंवा लग्नाच्या आधी पत्नी गरोदर असल्याची गोष्ट असो. तो नेहमीच चर्चेत असतो. पण ह्या चर्चेना त्यांनी कधीच जुमानले नाही.

आपल्या सोशल मीडियावर त्याने आपली पत्नी गरोदर असल्यापासून ते बाळ होत पर्यंत सर्वच प्रवास फोटो मार्फत आपल्या अकाऊंटवर पोस्ट केले होते. ह्या लॉक डाऊन मध्ये रुग्णालयात न जाता घरात राहूनच योग्य ती ट्रीटमेंट घेत नताशा आणि हार्दिक ह्यांनी काळजी घेतली.

काहीच दिवसांपूर्वी हार्दिक आणि नताशा ह्यांनी गरोदरपणात प्रोफेशनल फोटोशूट केले होते. हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान वायरल झालं. हे तुम्ही आम्ही पाहिलेच असेल आणि आज ही आनंदाची बातमी समोर येताच दोघंही आई बाबा खूप खुश आहेत.

भारतीय क्रिकेट मधील खेळाडूंनी अनेक मजेशीर कमेंट ह्या फोटो खाली दिल्या आहेत. काहीच दिवसात आयपीएल २०२० चे रणसंग्राम सुरू होणार आहे. अशातच हार्दिक पांड्या साठी हि बातमी समोर आल्यानंतर आपण स्वतःला लकी समजतो. बाळाच्या आगमनाने माझा खेळ मुंबई इंडियन्स साठी अजून बहरून येईल. असेही त्याने म्हटले.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *