क्रिकेट खेळाडू नेहमी आपल्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. आपले राहणीमान, मोठमोठ्या वस्तू, फ्लॅट्स, अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात येणे जाणे चालूच राहते. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सुद्धा ह्याच गोष्टी मुळे अनेकवेळा प्रकाशझोतात असतात. मग त्यात महेंद्र सिंग धोनीच बाईक्स प्रेम असो की हार्दिक पांड्याच नवनवीन घड्याळ कलेक्शनच प्रेम असो.
पुन्हा एकदा हार्दिक पांड्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या ताफ्यात आणखी एका घड्याळाची नोंद झाली आहे. हे घड्याळ साधे सुधे नसून पाच कोटिंच आहे. चकित झालात ना? हो चकित होण्यासारखे ही बातमी आहे. Patek Philippe Nautilus Platinum 2711 असे ह्या घड्याल्याच्या ब्रँडच नाव आहे.

भारतात खूप मोजक्याच लोकांकडे हे घड्याळ आहे. त्यात आता हार्दिक पांड्याची सुद्धा ह्यात नोंद झाली आहे. महागडे घड्याळ घेणे हा हार्दिकचा छंदच आहे. हेच नाही तर अशी अनेक लाखो, कोटी रुपयांची घड्याळे त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. सध्या हार्दिक आयपीएल साठी दुबईमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. सप्टेंबर पासून आयपीएलचा उर्वरित महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल.
हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत Patek Philippe Nautilus Platinum 2711 घड्याळाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ह्या त्याच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी चांगल्या तर काहींनी वाईट कमेंट सुद्धा केल्या आहेत. काही नेट कऱ्यांच्या मते एवढा पैसा संपवण्यापेक्षा दान धर्म करून लोकांचे पुण्य पदरात घालून घ्या. तुम्हाला हार्दिक च्या ह्या भल्या मोठ्या खरेदीवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.