मनोरंजन

भारताची हरनाज संधू ठरली मिस युनिव्हर्स

भारताची हरनाज संधू Harnaaz Sandhu २०२१ ची मिस युनिव्हर्स Miss Universe 2021 ठरली आहे. तिने हा मानाचा समजला जाणार पुरस्कार मिळवला आज प्राप्त केला. भारताने तब्बल २१ वर्षानंतर या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. या आधी २००० मध्ये लारा दत्ताने हा किताब आपल्या नावावर केला होता. त्यांनतर आज हरणाज ने तीच किमया करून दाखवली.

Source Miss Universe Social Handle

इस्राईलमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन केले होते. मागच्या वर्षी या स्पर्धेची विजेता मॅक्सिको मॉडेल अंड्रिया मेटा ठरली होती. तिने जिंकलेला ताज आज हरनाजच्या डोक्यावर सजवून जगाला एक नवीन क्विन दिली. जेव्हा ही बातमी सोशल मीडियावर वायरल झाली आहे तेव्हापासून भारतीय जनता हरनाजचे अभिनंदन करत आहेत. अनेक सेलेब्रिटीनी सुद्धा तिला विजयच्या सुभेच्छा दिल्या आहेत.

हरनाज संधू ही पंजाब मधून आहे. तिला मॉडेलिंग पाठोपाठ अभिनय, नृत्य, स्विमिंग, योगा, गाणं यात सुद्धा रुची आहे. या आधी तिने २०१७ मध्ये टाइम्स फ्रेश फेस चंदीगड हा किताब आपल्या नावावर केला होता. ती पंजाब फॅमिना मिस इंडिया २०२० सुद्धा आहे. दोन पंजाबी सिनेमात सुद्धा तिने आपल्या अभिनयाची झलक लोकांना दाखवली आहे.

Source Harnaaz Sandhu Social Handle

तिने आपले शिक्षण चंदीगड मध्ये गर्ल्स कॉलेजमधून पूर्ण केलं. सध्या ती Public Adminstration Master चे शिक्षण घेत आहे. तिने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकून भारताचे नाव एकदा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मॉडेल सुद्धा कुनापेक्षा कमी नाही हे हरनाज ने दाखवून दिले.

इस्त्राईल मध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी अनेक बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गजानी हजेरी लावली होती. यात मलायका अरोरा, क्रिती सेनन, अश्विनी अय्यर तिवारी, कनिका कपूर, पंकज अडवाणी, अंगद बेदी यांचा समावेश आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *