हेल्थ

ही लक्षणे आढळली तर हार्ट अटॅक्ट येऊ शकतो असे समजा

सध्याच्या काळात हार्ट अटॅक्ट कोणत्याही वयात येऊ शकतो हे सिद्ध झालेले आहेत.  म्हणजेच काय तर ही आपल्यासाठी खूप चिंतेची बाब आहे आणि म्हणून या आजाराकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायला हवे. हार्ट अटॅक्ट कधीही आणि कुठेही येऊ शकतो त्यासाठी आपण स्वतःहून सतर्क असायला हवे. फक्त छातीत दुखणे म्हणजे हार्ट येणे नाही  याशिवाय छातीत दुखणे हे सुध्दा हार्ट अटॅकचे कारण असू शकते. म्हणून हार्ट अटॅक्ट येतोय हे कसे ओळखावे हे आज पाहूया.

छातीत दुखणे यामुळे हार्ट अटॅक्ट येऊ शकतो त्यासाठी दुखणे हे एक वेगळ्या प्रकारचे असते. जास्त व्यायाम केल्यामुळे, किंवा जास्त चालणे, जिम जास्त प्रमाणत करणे यामुळे हार्ट अटॅक्ट येऊ शकतो. बऱ्याच वेळा उलटी आणि मळमळ ने ह्या ही समस्या होऊ शकतात किंवा एसिडीटी ही होऊ शकते ह्या समस्या असतील तर दुर्लक्ष अजिबात करू नका.

तसेच तीव्र प्रमाणात डोकेदुखी असणे तसेच चक्कर येणे ही लक्षणे ही असू शकतात. छातीत दुखणे हे अशा प्रकारचे असू शकते, छातीत जोरात दाबल्या सारखे वाटणे, दुखण्याच्या वेदना डाव्या हातात येणे तसेच तोंडाच्या जबड्यात किंवा मानेत येणे. अशा प्रकारे दुखणे वाटल्यास खबरदारी घ्या.

नेहमीचा श्वास घेण्यासाठी त्रास होणे तसेच खूप जास्त प्रमाणत घाम येणे हे ही हार्ट अटॅक्ट ही लक्षणे असू शकतात. अचानक कसे तरी वाटणे एकप्रकारची भीती वाटणे. अशावेळी नेहमी काय करावे हे समोरच्याला कळत नाही तर अशा वेळी ह्रदयाच्या बाजूला छातीवर दाब द्यावा. त्या व्यक्तीला आपल्या मुखावाटे श्वासोच्छ्वास द्यावा. लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ही समस्या आपल्यापासून दूर राहावी याकरिता आपला आहार हा पौष्टिक असावा त्यासाठी जेवणात जास्त तेलकट आणि तिखट नसावे. त्यामुळे तुमच्या नसा मध्ये तेलकट कमी साचेल. याशिवाय रोज योग्य तो व्यायाम करणे गरजेचे आहे. पण व्यायामाचा अतिरेक करू नये. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव पासून लांब रहा कोणतेही त्रास देणारे कार्य करू नका त्यापासून लांब रहा.

सर्वात आधी अशी लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *