क्रीडा

भारताची स्टार धावपटू हिमा दासला DSP पदवी बहाल

Hima das Dsp

भारताकडे अनेक गुणी खेळाडू आहेत. अनेकांनी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करत जगभरात भारताचे नाव मोठे केले आहे. यातलंच एक नाव म्हणजे हिमा दास. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली हिमा हलखीच्याच परिस्थिती मधून आली. मात्र जिद्द आणि चिकाटीने तिने ओल्या स्वप्नांचा पाठवलाग केला.

भारताची स्टार धावपटू हिमादास म्हणजे खेळाडूंच्या दुनियेतला तारा असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावणाऱ्या या धावपटूच्या कामगिरीचा परिणाम म्हणजे सरकारने हिमाच्या अद्वितीय कामगिरीबद्दल तिला DSP हे पद बहाल केले आहे. अवघ्या विसाव्या वर्षीच स्पोर्टस कोटा मधून डायरेक्ट DSP पदावर नेमणूक होणारी  हिमा पहिलीच महिला ठरली आहे.

या नंतर खेळात विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरळ भरती दिली जाईल असा कायदा ही लवकरच अस्तित्वात येईल. केवळ वय वर्षे वीस असताना ही अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल तिचा हा सन्मानच केला गेला आहे असे म्हणायला हरकत नाही. आसामचे मुख्यमंत्री  सारबानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिमा दास ना उपअधीक्षक म्हणून नेमण्यात आले.

हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याच बरोबर अनेक स्पर्धांमध्ये नाव उंचावले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे. सामान्य परिस्थिती मधून आलेली हिमाच्या संघर्षाची गोष्ट ऐकताना खरचच अंगावर काटा उभा राहतो. हिमाने २०१८च्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

त्याच बरोबर महिलांच्या ४०० मीटर रिलेच्या विजेत्या संघात ती होती.  DSP झाल्यावर हिमाला कसे वाटतेय असे विचारल्यावर तिने फारच अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले. लहानपणी पासून मला पोलीस ऑफिसर होण्याची इच्छा होती. आणि ती आज पूर्ण झाली. माझ्या आईची देखील इच्छा असल्याने खाकी वर्दी अंगावर घेण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं..

हिमाला आधी तर एक फुटबॉल पटू होण्याची इच्छा होती. सामान्य कुटूंबात जन्माला आलेल्या हिमाला आपल्या भावंडांसोबत फुटबॉल खेळणे खूप आवडायचे. भविष्यात आपण फुटबॉल पटूच होऊ असेही स्वप्न तिने उराशी बाळगले होते. मात्र ओघ दुसरीकडे गेला तो तिच्या चपळाईने. अगदी कमी वेळात चपळाईने अंतर पार करणाऱ्या हिमाच्या अंगातील कौशल्य पाहून तिच्या शाळेतील प्रशिक्षकांनी तिला धावण्याच्या स्पर्धेत उतरण्यासाठी सांगितले.

दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या हिमाला ती चपळाई काही नवीन नव्हती. गरज होती ती फक्त मार्गदर्शनाची. आधी छोट्या छोट्या स्पर्धेत भाग घेऊन यश मिळाल्याने तिने यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता आशियाई खेळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात देखील सुवर्णपदकं मिळवली. या यशाने भारतासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

हिमाने DSP पद संभाळाल्यावर देखील आपण आपल्या खेळाची कारकीर्द अशीच पुढे ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. हिमाकडे असलेल्या जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रम याने मात्र तिच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवले. एकदा आपल्या भावंडांसोबत भात खाचरात फुटबॉल खेळत असताना एका प्रशिक्षकाने बघितले. तिची चपळाई आणि शारीरिक क्षमता पाहून हे अवाक झाले. त्यांनी तिला अथलेटिक्स मध्ये येण्याचा सल्ला दिल्यावर इथून पुढे हिमाच्या खऱ्या प्रवासाला सुरवात झाली.

मात्र सातत्य ठेवत आता ती आपल्या क्षेत्रातील एक आदर्श बनली आहे यात मात्र शंका नाही.  हिमाच्या या बातमी नंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला मात्र काही प्रमाणात संमिश्र प्रतिक्रिया देखील पाहण्यात आल्या. काहींच्या मते हा निर्णय सर्वास्वी योग्य आहे तर काहींनी याविषयी आपले वेगळे मत मांडले. मात्र काहीही असो सरकारच्या या नियमामुळे खेळाडूंपुढे हिमा एक नवी आदर्श बनली आहे यात मात्र तीळमात्र ही शंका नाही.

भारताची स्टार धावपटू असलेली हिमा दास आता लवकरच आपला पदभार सांभाळणार असून यानंतर देखील आपल्या खेळाडु वृत्तिकडे विशेष लक्ष देणार असल्याचं तिने सांगितले. यानंतर देखील आपल्या स्पर्धा थांबणार नाहीत असेही सांगायला ती विसरली नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *