मनोरंजन

देवमाणूस मधील चंदाला ही भूमिका कशी मिळाली ते बघा

देवमाणूस ही मालिका सध्या तरी बंद आहे पण तिचा कधीही दुसरा भाग येईल कदाचित डिसेंबरमध्ये येईल अशी बातमी आली आहे. पण तरीही होऊन गेलेल्या भागात अनेक नवीन नवीन कलाकार येऊन गेले त्यातील महत्त्वाची भूमिका करणारी एक अभिनेत्री म्हणजे चंदा होय हीची भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. खूप कमी वेळात तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

तिचे खरे नाव माधुरी पवार आहे हे तुम्हाला माहीतच आहे शिवाय ती एक उत्तम डान्सर आहे. तिचा अभिनय तर फारच छान आहे हे तुम्ही पाहिले असेल पण तिला हे काम कसे मिळाले हे सुध्दा तुम्हाला कळणे गरजेचे आहे. ती त्याबद्दल बोलताना म्हणाली की पहिल्यांदा ही भूमिका मिळाली तेव्हा ती घाबरलीच कारण हे पात्रच तसे होते.

एखादी दारू विकणारी बाई साकारणे खरंच तिच्यासाठी आव्हानास्पद होते. तिला काही वेळातच या भूमिकेसाठी होकार द्यायचा होता आणि तिने तो दिला. हे पात्र माधुरी पवार हिला बघूनच लिहले गेले आहे. असे ती म्हणाली आणि नंतर ते तिला सांगितले ते ही अचानक. शिवाय ही झी मराठी वरील देवामाणूस मधील भूमिका करण्यासाठी माधुरी नकार देऊच शकत नव्हती हे माहीत होते त्यामुळे तिचा ही लगेच होकार आलाच.

चंदाचे काही डायलॉग सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले आहेत, ‘चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही , सगळं वसुल करते व्याजा सकट’, असे आहेत. सध्या चंदाचा देवी सिंगने मालिकेत जीव घेतला आहे. त्या त्यामुळे यापुढे ती आपल्याला या मालिकेत दिसणार नाही. पण पुढच्या वाटचाली साठी तिला सुभेच्छा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *