तुम्हाला माहीतच आहे ऑक्सिजन ची किती गरज आपल्या शरीराला आहे. ऑक्सिजन हा एक प्राणवायू आहे. तुम्हाला ही गोष्ट सांगायला नको की ऑक्सीजन आपल्या शरीराला नाही मिळाले तर आपला मृत्यू ही होऊ शकतो. सध्याचा काळ कोरोना व्हायरसने ग्रासलेला आहे. त्यामुळे आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायला हवी.
स्वप्नात सुध्दा पाहिले नव्हते की असा ही रोग येऊ शकतो या रोगावर अजूनही लोकांचे तर्क वितर्क चालू आहेत. एक मात्र खरं की तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल ही जास्त हवी ती कमी झाल्यास तुम्हाला या रोगाची लागण लगेच होऊ शकते. त्यातही पाहिले तर तुम्ही तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कसे ओळखाल की तुमच्या शरीरात त्याची कमतरता आहे ते बघुया.
थोडे काम केल्याने लगेच थकवा जाणवणे किंवा थोडे चालल्याने ही लगेच थकवा जाणवणे ही ऑक्सिजन लेवल कमी असण्याची लक्षणे आहेत. याशिवाय श्वास घेताना त्रास होणे छातीत सतत दडपण येणे, भीती वाटणे, वारंवार थकवा येणे महत्वाची लक्षणे असू शकतात.
त्यासाठी रोज सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत योग्य तो आहार तुमच्या पोटात जाणे गरजेचे आहे. याच बरोबर थोडा व्यायाम, साधे चालणे, किंवा योगा करणे उत्तम आहे. तुम्ही जर हद्दी पेक्षा जास्त मेहनत करत असाल तर तितके अन्न तुमच्या पोटात जायला हवे. अधिक मेहनत आणि कमी खाणे यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकते.
होऊ शकतात हे आजार
शरीरात ऑक्सिजनची कमी असल्याने ब्रेन डॅमेज, हार्ट अटॅकची परिस्थिती निर्माण होते.
शुगरचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाली तर शुगर अचानक वाढू शकते व ते जीवावर देखील बेतण्याची शक्यता असते.
ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने थायरॉईल हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे थायरॉई़ड मोठ्या प्रमाणात वाढू किंवा कमी होऊ शकते.
दमा,खोकला, फुस्फुसंचे इन्फेक्शन, मायग्रेन, डोळ्यांचे आजार इत्यादी आजार ऑक्सिजनच्या कमतरते मुळे होऊ शकतात.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्याचा जास्त परिणाम हा फुस्फुसावर होत असतो.
ऑक्सिजनची मात्रा तुमच्या शरीरात कशा प्रकारे वाढवू शकता हे बघुया
त्यासाठी तुळस हे खूप महत्त्वाची वनस्पती आहे. आपल्या सर्वांच्या घरात किंवा घरा समोर तुळशीचे एक तरी रोप असायला हवे. तुळशीची रोज चार पाने चाऊन खा किंवा तुळशीचा रस याशिवाय तुळस काढा बनवून तो प्यायल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि शरीरातील ऑक्सिजन ची लेवल ही वाढेल.
याशिवाय आहारात लोह भरपूर प्रमाणात घेणे फायद्याचे आहे यामुळे ऑक्सिजनची कमी दूर होते. कारण ऑक्सिजनच्या प्रवाह समतोल राखण्यात लोह खूप उपयोगी आहे.
1 Comment