हेल्थ

जिभेवरून कसे ठरतात तुमचे आजार, आणि त्यावरूनच डॉक्टर ही निदान करतात

जीभ आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच काय तर आपण जगण्यासाठी जे अन्न सेवन करत असतो त्याची चव ही जिभेमुळेच मिळत असते. त्यामुळेच आपण जेवण आवडीने जेवतो. जर त्याला चवच लागली नाही तर जेवणच जाणार नाही. याशिवाय बोलण्यासाठी ही जीभेचा उपयोग होतो ज्याला जीभ नाही त्याला बोलायला ही जमत नाही म्हणजे बघा किती महत्वाचा अवयव आहे आपली जीभ.

जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी या जिभेवर ही त्याचा परिणाम झालेला असतो. पण कधी कधी हा परिणाम अगदी सूक्ष्म असू शकतो त्यामुळे तो आपल्याला दिसत ही नाही. आता बघा जर आपण निरोगी आहोत तर आपली जीभ ही सुंदर गुलाबी रंगाची खरबडीत असते. जर तुमच्या शरीरात फॉलीक एसिडची बी 12 ची कमतरता असेल तर तिचा रंग लाल होतो.

जर तुमची जीभ फुगलेली आणि तिचा रंग स्ट्रॉबेरी सारखा असेल तर तुमच्या अंगात ताप आहे. काही वेळेला उष्णेतेमुळे जीभ पांढरी पडते. शिवाय अती व्यसन तंबाखू यामुळे ही जीभ पांढरी पडते. शिवाय पचनसंस्थेत बिघाड आल्यामुळे ही असा पांढरा रंग येतो. तुमच्या जीभेचा रंग पिवळा पडला असेल तर यावेळी तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असू शकेल. म्हणजेच सर्दी चा त्रास असू शकतो. किंवा शरीरात जास्त उष्णता वाढणे हे संकेत आहेत. शिवाय पिवळा रंग आणि कोरडी पडणे म्हणजे कावीळ होय.

शिवाय जीभ नुसती कोरडी पडणे म्हणजे शरीरात अशक्त पणा, थकवा येणे होय. याशिवाय आतड्यांना सूज येणे, झोप नीट न घेणे. जीभेचा रंग निळसर पडतो तर कधी कधी आपण काही औषधे घेतो त्याचा साईड इफेक्ट हा जिभेवर दिसून येतो. कधी कधी जिभेवर पांढरे डाग दिसून येतात ये सुद्धा कोणत्याही इन्फेक्शन मुळे किंवा अती घाम यामुळे येऊ शकतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *