विचारधारा

पावसाळ्यात घरात नेहमी त्रास देणारा जीव म्हणजे मुंग्या त्यापासून अशी करा सुटका

घरात प्रत्येक ठिकाणी दिसणारी मुंगी ही डोक्याला ताप देत असते. त्यांना किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी त्या अजिबात जात नाहीत. जास्त करून त्यांची गर्दी पावसाळ्यात दिसत असते. घरात कुठेही काही साखर किंवा काहीही पदार्थ सांडले असल्यास त्याला लगेच मुंगी लागते. आणि ह्या मुंग्या चावल्या की खूप जळजळ होते त्या आपल्या घरगुती पद्धतीने कशा घालवायचा हा प्रश्न घरातील स्त्रीला नेहमी पडत असतो. आज आपण बघुया त्यांचा कोणत्या प्रकारे नायनाट करता येईल.

आता तुम्ही बोलाल आम्ही खडूच्या रेषा मारतो मात्र हा खडू तुमच्या घरातील एका छोट्या मुलाने सहज काढलेल्या रेषेला हात लावला आणि तोंडात घातला तर किती महागात पडेल याशिवाय स्प्रे मुले स्वसन यंत्रावर होणारे त्रास हे वेगळेच असतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मुंग्याचा त्रास नको असेल तर घर स्वच्छ ठेवायला शिका त्यासाठी फारशी, फिनेल ने स्वच्छ पुसा त्यामुळे मुंग्यांना येण्यावर पायबंद बसेल. पहिली गोष्ट म्हणजे घरात मुंग्यावर औषध काहीही नसेल आणि मुंग्या आल्या असतील अशा वेळी त्यांच्यावर लगेच मिरची पावडर किंवा मीठ टाका त्यामुळे त्या दूर निघून जातील. किंवा मिठाच्या पाण्याने लादी पुसा, याशिवाय लिंबाच्या रसात मीठ घालून मुंग्या असतील त्या ठिकाणी टाका.

घरातील ज्या ठिकाणी सतत मुंग्याचा वावर असेल अशा ठिकाणी तुम्ही हळद आणि फटकी पावडर मिसळा आणि हे मिश्रण त्या ठिकाणी टाका. ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे रोज ऍपल व्हिनेगर आणि ठेवड्याच मापाच पाणी घ्या हे मिश्रण स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि त्या ठिकाणी मारा.

लिंबाच्या सालीचे बारीक बारीक तुकडे करून ते मुंग्या असणाऱ्या ठिकाणी टाकावे तसेच तमालपत्र ही ठेऊ शकता. किंवा त्या ठिकाणी तमालपत्रची पावडर ठेवा. अशा वेळी मुंग्या अजिबात घरात प्रवेश करणार नाहीत. याशिवाय मिरी पावडर ही टाकू शकता त्यामुळे मुंग्या घरात अजिबात येणार नाहीत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *