क्रीडा

कसे होऊ शकता क्रिकेट मध्ये अंपायर?

Umpire salery

क्रिकेट हा खेळ सर्वांच्या आवडीचा त्यात भारतात तर क्रिकेट ह्या खेळाला जणू पुजले जाते. सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट खेळाडूंची एक वेगळी ओळख असते त्याच प्रमाणे आणखी एका व्यक्तीची एक विशिष्ट ओळख असते. जर ती व्यक्ती मैदानात नसेल तर सामना होऊच शकत नाही.

आता तुम्ही म्हणाल अशी व्यक्ती नक्की आहे तरी कोण? पण काहींनी मात्र ओळखले सुद्धा असेल. हो आम्ही सांगत आहोत अंपायर बद्दल. अंपायरमुळे ह्या खेळाची सुरुवात आणि शेवट होतो. एकाच जागेवर तासनतास उभे राहून चेंडूवर करडी नजर ठेऊन त्यांना उभे राहावे लागते. आपल्याला टीव्हीवर पाहताना हा जॉब सर्वात सुंदर आणि मेजेशीर दिसत असला तरी हा जॉब सर्वात कठीण आहे.

अंपायरची एक छोटी चूक सुद्धा दोन्ही टीम ना महागात पडू शकते. त्यांचा एक चुकीचं निर्णय कोणत्या एका संघाकडून दुसऱ्या संघाला विजयी करू शकतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की अंपायर नक्की कसे बनतात आणि त्यासाठी कोणती परीक्षा असते? चला तर मग आपण आज हे जाणून घेऊया.

कोण बनू शकतो अंपायर? – अंपायर कुणीही बनू शकतो. खूपच कठीण असे त्यात काहीच नाहीये. तुम्हाला क्रिकेट बद्दल माहिती असो किंवा नसो तरीही तुम्ही अंपायर बनू शकता. फक्त एवढेच की क्रिकेट ह्या खेळाबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुमचा मार्ग अधिक सोपा होऊन जातो. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट मध्ये असलेले ४२ नियम तुम्हाला तोंडपाठ असणे गरजेचे आहे.

अंपायर बनण्यासाठी राज्य स्तरीय स्पोर्ट बॉडि मार्फत अनेकवेळा परीक्षा घेतल्या जातात. ह्यात अनेक छोट्या मोठ्या परीक्षांचा समावेश असतो. जर ह्या परीक्षेत तुम्ही पास झालात तर बीसीसीआय मार्फत एक अंपायर परीक्षा होते. त्यात जर तुम्ही पास झालात तर तुम्ही अंपायर बनू शकता.

त्यांनतर बीसीसीआय अंपायरचे वेगवेगळे पॅनल बनवते. अनेक मुलाखती घेते जर ह्या मुलाखतीत तुम्ही पास झालात तर नॅशनल किंवा इंटरनॅशनल मॅच मध्ये अंपायरिंग करण्याची संधी मिळते. ह्या मॅच मध्ये त्यांना योग्य ते मानधन सुद्धा प्राप्त होते. अंपायरना किती मानधन मिळतो ते पण आपण पाहूया.

बीसीसीआई अंपायर पॅनल मध्ये आल्यानंतर अंपायर ना वेतन सुरू होते. हे वेतन सुद्धा खूप जास्त असते. ज्याप्रमाणे खेळाडूंची ग्रेड असते तशाच प्रकारे अंपायरची सुद्धा ग्रेड बनवलेली असते. ह्याच ग्रेड मार्फत त्यांना मानधन दिले जाते. टेस्ट आणि एकदिवसीय सामन्यात त्यांना सिरीज प्रमाणे मानधन मिळते. तर बीसीसीआयकडून वार्षिक ३० लाख रुपये मिळतात.

एकदिवसीय एका सामन्यासाठी त्यांना एक ते दीड लाख तर टी ट्वेण्टी सामन्यासाठी त्यांना सत्तर हजार रुपये मिळतात. हे आकडे ऑनलाईन मिळालेल्या बातमीनुसार आहेत. ह्यात कमी जास्त सुद्धा असू शकतं.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *