हेल्थ

तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता?

रोगप्रतिकार शक्ती

आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती का कमी होते? याची माहिती फारच थोड्या व्यक्तींना असते. पण सध्याच्या काळात ही माहिती सर्वानाच असणे आवश्यक आहे. सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच नाही तर असे अनेक आजार आहेत जे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यावर तुम्हाला लगेच होऊ शकतात.

अशा व्यक्तींना सर्दी, खोकला, फुस्पुसाचे आजार, किडनीचे आजार लगेच होतात. हे सर्व आजार आपल्याला का होतात तर आपली प्रतिकार शक्ती कमी असते म्हणून आपले शरीर बाहेरच्या व्हायरस सोबत लढा देण्यास समर्थ ठरतो. यासाठी आपली खाण्या पिण्याची पद्धत कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ही पद्धत बदलून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. अशा कोणत्या सवयी किंवा कारणे आहेत ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमी होते ते बघुया.

जेव्हा थोडे काम केल्यामुळे लगेच थकवा जाणवतो, जिना चढल्यावर थकवा येतो, कधी कधी रक्त कमी असल्यामुळे ही अशा गोष्टी होऊ शकतात. पण ज्यावेळी अशी कारणे तुमच्या शरीराला जाणवत नसतील तरीही तुम्हाला लगेच थकवा जाणवत असेल तर समजून जा तुमची प्रतिकार शक्ती कमी आहे.

तुम्ही सतत आजारी पडत थोड्या थोड्या कारणाने आजारी पडणे, थोड्या धुळीने ही घास खवखवणे, सर्दी होणे तसेच खोकला होने हे आजार लगेच जखडत असतील तर समजून जा तुमची प्रतिकार शक्ती कमी आहे. किंवा कधी काही कारणाने जखम झाली असेल आणि ती लवकर बरी होत नसेल जखम भरून यायला वेळ लागत असेल तर समजून जा तुमची प्रतिकार शक्ती खूपच कमी आहे.

जेव्हा तुम्ही पैन किलर औषधांचा अतिवापर तुमच्या शरीरावर करता याचबरोबर काहीच न खाता या औषधांचा मारा तुमच्या शरीरावर वारंवार करणे योग्य नाही. अपूर्ण झोप घेतल्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळत नाही त्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडता.

सतत युरिन इन्फेक्शन आणि हगवण यांसारखे आजार होत असतील तर समजून जा तुमची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे. प्रत्येक ऋतु हा वर्षाला बदलत असतो या बदलणाऱ्या ऋतु मध्ये प्रत्येक वेळी तुम्ही आजारी पडत असला तर समजून जा प्रतिकार शक्ती कमी आहे.

व्हिटॅमिन डी याची आपल्या कमतरता असणे हे सुधा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

त्यामुळे तुम्हाला जर तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी व्हिटॅमिन सी चा आहारात उपयोग करा. यासाठी दिवसातून दोन वेळा तरी कमी कमी खर्चात मिळणारे लिंबू पाणी प्या.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *