विचारधारा

डिप्रेशन म्हणजे नैराश्य हे कोणालाही येऊ शकते त्यातून बाहेर कसे पडायचे?

नैराश्य हे कोणत्याही वयात आणि वेळेत येऊ शकते शिवाय त्यासाठी गरीब आणि श्रीमंत असा फरक नसतो. म्हणजेच तो कोणत्याही व्यक्तीला येऊ शकतो. बघायला गेलात आपण ज्यांचे फॅन असतो ते कलाकार ही डिप्रेशनचे शिकार असतात. एवढेच की ते आपल्याला माहीत नसते. आणि मग अशा काही गोष्टी समोर येतात आणि आपल्याला धक्के देतात. सुशांत सिंग राजपूत संदर्भात असेच काहीसे झाले. चला तर मग आज आपण पाहूया की तुम्ही डिप्रेशन पासून कसे दूर जाऊ शकता.

आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सतत बांधून रहा.
जेव्हा कधी तुम्हाला नैराश्य येईल तेव्हा तुम्ही ती गोष्ट त्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. ती व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देईल.अशा वेळी माणसाला एकटे राहायला आवडते कारण त्याच शरीर त्याची साथ देत नाही कोणाचेही ऐकायची त्याची तयारी नसते. म्हणून अशा वेळी कोणी तरी जवळची व्यक्ती त्याचे हे नैराश्य घालवू शकते.

त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या व्यक्ती जवळ आपले नैराश्य स्पष्ट करा. तो व्यक्ती तुम्हाला यातून मोकळं करू शकेल. जितकी तुमची नाती घट्ट तितके तुमचे स्वास्थ चांगल. फक्त आपण आपले मन कुणासोबत मोकळे करतोय आणि तो आपल्याला किती समजू शकतो हे समजणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. अजून कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता पहा.

आवडत्या देवाचे नामस्मरण
जेव्हा तुम्हाला खरंच नैराश्य येतं असेल तेव्हा तुम्हाला खरी शांतता हवी असते. कोणी तरी समजून घेणारे हवे असते. पण तेव्हा कोणीच नसते तेव्हा तुमचं देव असतो तुमच्यासोबत तेव्हा त्या देवाचे नामस्मरण करा. मन शांत ठेवा मनातून त्या देवाचे नाव घ्या. दुसरे काहीही मनात आणू नका. फक्त त्या देवाचे नाव घ्या तुमचं नैराश्य नक्की कमी होईल.

आवडत्या गोष्टीत मन गुंतवा
तुमची कोणती आवडती गोष्ट आहे ते अगोदर लक्षात घ्या. कादंबरी वाचणे, झाडे लावणे, घरातील करणे, टिव्ही बघणे, आवडती गाणी ऐका, योगासन करा इत्यादी अनेक कामे जी तुम्हाला मनापासून आवडतात ती करून तुम्ही तुमचे नैराश्य विसरू शकत स्वतला अशा कामात गुंतवा आणि नैराश्य फ्री रहा.

आहार योग्य असावा
तुमच्या रोजच्या आजाराचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यासाठी रोज योग्य तो आहार घ्यावा. बाहेरचे तेलकट, मैद्याचे, मसालेदार पदार्थ कमी खावे, तसेच अधिक गोड पदार्थ ही खाऊ नये. तुम्ही त्यासाठी पालेभाज्या, फ्रूट, सोयाबीन यांसारखे अन्न सेवन करा. फास्ट फूड खाऊ नका शिवाय व्यसन ही करू नका. त्यामुळे तुमचे नैराश्य अधिक वाढेल पण योग्य तो आहार घेतला की तुमचे डिप्रेशन कमी होते.

भूतकाळ विसरा
वर्तमानात काम करता असताना भूतकाळाचा विसर पडणे आवश्यक आहे, नाहीतर त्याचा परिणाम वर्तमानावर पडत असतो. जुन्या गोष्टी कायमच्या विसरून जा. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टींना कायमचा पूर्णविराम द्या. कारण भूतकाळ फक्त त्रास देऊ शकतो नी हा त्रास वर्तमानकाळ दूर करेल.

डिप्रेशन किंवा नैराश्य घेऊन ते कमी होत नाही शिवाय ते वाढते. त्यामुळे त्रास हा तुम्हाला होतो तुमचा आजार अधिक वाढतो. याखेरीज तुम्ही सर्व विचार आणि नैराश्य येणाऱ्या गोष्टी लांब ठेवा पूर्णपणे. त्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टी चांगले विचार मनात आणा त्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सुखकर होईल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *