हेल्थ

उन्हाळ्यात केसांच आरोग्य कसं जपाल?

सध्याच्या काळात केसांच्या समस्या जरा जास्तच डोकं वर काढत आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धावपळीचे जीवनमान या सर्वांमध्ये स्वत्ताकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे ज्या त्या ऋतूत काही विशेष काळजी घेतली पाहिजे. हिवाळा संपत आला आणि उन्हाळ्याला सुरवात झाली तर आपण आता आरोग्य सदरातून दर दिवशी शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती पाहणार आहोत. उन्हाळ्यात घायव्याच्या विशेष काळजी देखील यात समाविष्ट आहेत. हिवाळा संपला चाहूल लागली ती उन्हयाळीची  तुम्ही देखील ह्याच काळजी मध्ये असाल की आता स्किन ,केस सगळ्याची काळजी घ्यायला लागेल.

हो नक्कीच वातावरणानुसार काही बदल तर जीवनशैली मध्ये करायला हवेत. ज्याने आपलं आरोग्य उत्तम राहायला मदत होईल. उन्हाळ्यात जबरदस्त वाढलेलं ऊन आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे टाळू, केस यामध्ये चिकटपणा येतो होतात व केसांच्या ,स्किन च्या अनेक समस्या उद्भवतात. तुम्हाला जर लांबसडक, घनदाट आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही तुमच्या केसांवर बरेच प्रयोग करत असता  पण तुमचे केस जर पातळ,पांढरे असतील तर तुम्हाला या केसांची निगा राखणं खूपच कठीण होत असेल या केसांमुळे तुमची चिंताही वाढत जाते.

पण यात अनेक छोट्याछोट्या गोष्टी आहेत ज्या करून आपण घरगुती पद्धतीने केसांचं आरोग्य राखू शकता. अशा वेळी आपण पार्लर, पासून ते डॉक्टर पर्यंत सर्व उपाय करून पाहतो. मात्र  या उपचारांनी केस तर चमकदार होत असतात. पण आपला खिसा मात्र रिकामा होतो हेदेखील तितकंच खरं आहे. सध्या केसांच्या अत्यंत महागड्या ट्रीटमेंट मिळतात. स्पेशालिस्ट कडे जाल तर फक्त भेटण्यासाठी वेगळे चार्ज करावे लागतात.

 खरं तर तुम्ही पार्लर किंंवा डॉक्टरांकडे सतत जाण्यापेक्षा घरच्याघरी थोडी मेहनत केलीत तर केसांसाठी चांगले हेअर मास्क बनवून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. ही गोष्ट तर प्रत्येकाच्याच लक्षात येते की वातावरणातील बदलामुळे, अतिरिक्त तणावामुळे,प्रदूषण, शॅम्पू, सुवासित तेल यांच्या अतिरिक्त वापरामुळे आपले केस खराब होतात. म्हणजे नकळतपणे आपण केमिकल युक्त पदार्थ ग्रहण करून आणि केसांना लावून नकळतपणे आपल्या केसांची वाट लावतो. चला तर पाहू केसांची काळजी कशी घ्यावी ते पण आपलं रोजच्या दगदगीच्या जीवनातून वेळात वेळ काढून

खारट  पदार्थांचे सेवन करणे ही गोष्ट केसांचा मोठा शत्रु मिठ आहे म्हणून वरचढ पेक्षा थोड्या कमी मिठाचाच आहारात वापर करा लोणच पापड याचा कमीच वापर करा. शक्य होईल तितके वरचे मीठ खाणे टाळा. आहारात तेलकट आणि खारट पदार्थ खाणे टाळा. केस कमी प्रमाणात मोकळे ठेवा. जिथे धूळ आणि प्रदूषण असेल अशा ठिकाणी शक्यतो स्कार्फ बांधा. सतत शाम्पू लावणे टाळा. अन्यथा यामुळे केसांना हानी पोहोचू शकते.पण खूप घट्ट आवळून बांधू नका यामुळे केसांची मुळे दुबळी होतात आणि केस तुटण्याचा धोका संभवतो. रोज व्यवस्थित तेल लावून केस बांधल्यास केसांची वाढ चांगली होऊन, केसांमधील रुक्षपणा कमी व्हायला मदत होते.

घरगुती कंडिशनर म्हणून दही, अंडी, मेहंदी, आवळा असे गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. जास्वंदीची फुलं आणि त्याचा रस तेलात मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना नैसर्गिक पोषणतत्त्वे मिळतात. केस काळे आणि मजबूत होतात. केसांची मसाज करताना आपल्या बोटांच्या टोकांनी डोक्याच्या त्वचेला हळुवार मसाज करावा. हाताच्या तळव्याने डोके कधीही रगडू नये कारण त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.मसाज करताना हलक्या हाताने करावा, मसाज करणे अतिशय महत्वाचे असते कारण त्यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. मसाज साधारण १० ते १५ मिनिटे करावा.

शक्यतो स्टेप बाय स्टेप मसाज करावी. केसांसाठी तर चांगले आहेच त्याच बरोबर डोकं देखील शांत राहते. मसाज करताना चागंल्या शुद्घ तेलाने मसाज करावी. यासाठी आँलीव आँईल, तीळ, एरंडेल किंवा खोबरेल तेल चालेल.किंवा तुम्ही कोरफड, कडू लिंबाची पाने ,कडीपत्ता ची पाने ,जास्वंद ची फुले हे सगळं एकत्र करून खोबरेतेलात मिसळून मस्त तेल ही बानऊ शकत हे तर खूपच गुणकारी आहे. शांपू खरेदी करताना नेहमी पीएच घटकाबाबत तटस्थ असलेला म्हणजेच ज्यामधील पीएच रेंजचे प्रमाण पाच ते सात च्या दरम्यान आहे असा शांपू वापरावा; तो केस स्वच धुण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आणि केसांना तसेच डोक्यावरील त्वचेला त्यापासून कधीही हानी पोहचत नाही.

ज्या शॅम्पूचं जास्त फेस होतो ते शाम्पू डोक्यात कोंडा करतात. आपले केस धुण्यासाठी कायम थंड पाणी वापरा, अगदी थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क, आणि रखरखीत होतात ज्याचे परिणाम म्हणून केस गळायला सुरवात होते. कडक गरम पाणी करण्यापेक्षा थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरणे, सोबतच चेहरा धुण्यासाठी देखील कोमट पाणी वापरणे.

शांपू खरेदी करताना नेहमी पीएच घटकाबाबत तटस्थ असलेला म्हणजेच ज्यामधील पीएच रेंजचे प्रमाण पाच ते सात च्या दरम्यान आहे असा शांपू वापरावा; तो केस स्वच धुण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आणि केसांना तसेच डोक्यावरील त्वचेला त्यापासून कधीही हानी पोहचत नाही.

केस नियमित कापल्याने केसांची रुक्ष टोके नष्ट होतात आणि निश्चितच त्यांना एक निरोगी लुक भेटते. स्प्लिटन्स कमी झाल्यावर केस रुक्ष दिसत नाहीत. चमक वाढते. केसांना रंग लावताना कुठल्याही परिस्थितीत त्याचा स्पर्श तुमच्या डोक्यावरील त्वचेला होणार नाही याची जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घ्या.  रंगाचे त्वचेला स्पर्श होणे किंवा त्या मधील चुकीचे रासायानिक  घटक हेच बहुतेक वेळा केसांना इजा पोहोचवण्यास कारणीभूत ठरतात. मेंदी आणि तेल  अंडे यांचे मिश्रण केसान साठी अतिशय चांगले असते. त्याच सोबत योग साधना करावी,दीर्घ श्वसन करावे.

राग आणि चिडचिड यावर ताबा मिळवावा. पौष्टीक आहार घ्यावा,साजूक तूप, लाल भोपळा, पपई, बटाटा, शेंगदाणे, बदाम, अंडी ,मासे इत्यादीचा ,प्रोटिनयुक्त अँड लोह असलेल्या पदार्थांचा अधिक प्रमाणात आहारात समावेश करावा. हातांची नखे एकमेकांवर घासा. यामुळे केस गळती कमी होते. योग्य प्रमाणात झोप टेंशन फ्री वातावरण आणि जास्तीत जास्त योग ध्यान आणि व्यायाम करणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. त्यामुळे झोपण्याच्या उठण्याच्या वेळा ठरवून घ्या. खाण्यापिण्याच्या सवयी देखील ठरवा. फास्ट फूड खाणे,टाळा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *