कोळंबी कसलीही घ्या अर्धा किलो छोटी किंवा मोठी साफ करा स्वच्छ धुवून घ्या. कोलम किंवा बासमती बारीक तांदूळ घ्या, पाव किलो तांदूळ घ्या तुम्हाला हवं असल्यास जास्त तांदूळ घेऊ शकता. टोमॅटो तीन मोठे बारीक चिरून कांदे उभे चिरून घ्या. लसूण दहा ते बारा पाकळ्या, अर्धा नारळाचे दूध, गरम मसाला तमालपत्र चार, लवंग – मिरी ५, वेलची ३, दालचिनी एक तुकडा, चिरलेली कोथिंबीर, एवरेस्ट मटण मसाला, तेल, मीठ, हळद, मसाला
भांड्यात चार चमचे तेल घ्या. तुम्हाला जितके हवे तितके घेऊ शकता. फोडणीला पाहिले वेलची सोडून सर्व गरम मसाला टाका, नंतर लसूण टेचून टाका. लसूण शिजल्यावर कांदा टाका कांदा झाल्यावर त्यात हळद, चवीनुसार मसाला टाका नंतर टोमॅटो टाका, टोमॅटोचा थोडा गाळ झाल्यावर कोळंबी टाका परता आणि धुतलेले तांदूळ टाका. तांदूळ परतून घ्या इतके की त्याला तेल सुटला पाहिजे तेव्हाच तुमचा भात मोकळा होईल.
मग वरून नारळाचे दूध, गरम पाणी, एवरेस्ट मसाला आणि कोथिंबीर, मीठ घाला कड आला की वरून झाकण ठेवा. मस्त वाफाळलेला भात ताटात वाढा सोबत सलाड किंवा कोशिंबीर वाढा. बघा तर एकदा करून सारखे सारखे करावेसे वाटेल.

कोळंबी बिर्याणी साठी आपण सर्वच वेडे असतो पण हॉटेल मध्ये महाग मिळणारी ही बिर्याणी घरच्याघरी सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. वर दिलेली पद्धत अगदी सोपी आहे. समजली नसेल तर पुन्हा वाचा. आणि एकदा प्रयत्न करून नक्कीच घरी अशी बिर्याणी बनवा.