विचारधारा

सतत होणारे घरातील वाद कसे मिटवता येतील हे आज बघुया

वाद हे सगळ्याच घरात होतात पण त्याचा अतिरेक खूपच वाईट असतो. कधी कधी या वादातून कोणी कोणी स्वतला संपवून टाकतो आणि मग त्यानंतर डोळे उघडतात. पण तेव्हा डोळे उघडून काहीच फायदा नसतो. याशिवाय वाद हे घरातील कोणासोबत ही होऊ शकतात. सासू आणि सून, नवरा बायको, बाप आणि मुलगा अशी अनेक नाती आहेत त्यांच्यात वाद होऊ शकतो.

त्यासाठी कोणतेही छोटे कारण असू शकते म्हणून आज आपण हे वाद कसे मिटवता येतील आज बघणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य समाधान कारक जगू शकता. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा वाद होतो तेव्हा कोण चुकले याकडे दुर्लक्ष करा. त्यातून अजून वाद वाढेल. एकाने वाद वाढवला तर दुसऱ्याने गप्प ऐकून घ्या. दोघांनी बोललात तर वाद कमीच होणार नाही.

त्यामुळे घरातील वातावरण अधिक दूषित होईल. तुम्हाला कितीही राग आला असूद्या कमीपणा घ्या, प्रतिउत्तर देऊ नका. स्वतः शांत रहा. एकाने शांत राहिल्यावर भांडण आपोआप मीटेल. आपल्या जोडीदाराचे किंवा जी व्यक्ती आपल्याशी भांडण करत आहे तिच्या भावना समजून घ्या ती काय बोलते ते समजून घ्या. आपला राग आपल्यालाच कंट्रोल करायचा आहे. एकमेकांना दोष लाऊ नका शेवटी दोघांना एकाच घरात राहायचं आहे हे समजून घ्या.

कधीही समोरच्याची चुकी मानू नका आपण ही कुठेतरी चुकलो असा विचार करा. आणि हळूवार बोलून भांडण मिटवा. भांडणं झाले असेल आणि तुम्हाला कंट्रोल होत नसेल खूप चिडचिडेपणा होत असेल अशा वेळी नेहमी शांत रहा. पण समोरच्याचे बोलणे बंद होत नसेल अशा वेळी एकच पर्याय आहे बाहेर कुठे तरी जा. अशा वातावरणात जिथे तुम्हाला शांतता मिळेल. गार्डन मधे किंवा मंदिरात जाऊन देवाचे नाव घ्या जेणेकरून तुम्ही शांत व्हाल.

समोरच्या सोबत भांडण झाले असेल तर आणि त्याची समजून घेण्याची इच्छा नसेल तर अशा वेळी तुम्ही पुढे व्हा. त्याच मन हलकं होईल अस बोला. प्रेमाने विचार त्यामुळे तुमची भांडणे तिथेच संपुष्टात येतील. भांडणं झाले असेल तर अशा वेळी शांत रहा. कोणाचे चुकले यापेक्षा आपण भांडलो आणि म्हणून घरातील वातावरण गढूळ झाले आहे याकडे लक्ष द्या. आणि हे जरी समोरच्याला कळत नसले तरी तुम्ही समजून घ्या. आणि जाऊन त्या व्यक्तीची माफी मागा. जेणेकरून ती व्यक्ती माफ करेल किंवा नाही पण हळू हळू तिचा ही राग शांत होईल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *