विचारधारा

वेळ आणि पैसे वाचवण्याच्या युक्त्या, काही दिवसांतच दुप्पट सेविंग होईल..

पैसे खूप खर्च होतात ही प्रत्येकाच्या बाबतीत असणारी सगळ्यात मोठी तक्रार आहे. आपण पैसे कमावतो खरं पण त्याच्या गुंतवणूक आणि सेविंग कशी करावी या विषयी असलेले ज्ञान जरा अपुरेच पडते. मात्र या लेखात आपण कुठलीही गुंतवणूकी विषयी चर्चा करणार नाही आहोत. आपण या लेखात आपल्या आहे त्या खर्चात थोडेसे बदल करून जास्तीत जास्त पैसे कसे बचत करता येतील हे शिकूया.

बाहेर जाताना आपण नेहमीच खिशात पैसे आहेत की नाही हे तपासतो. पण दिवसभरात किती पैसे खर्च होतील हे मात्र काही नक्की नसते. थोडे थोडे करून आपण बरेच पैसे उडवतो.त्यामुळे खाली दिलेल्या काही भन्नाट टिप्स आहेत त्या व्यवस्थित वाचून आपल्या रोजच्या सवयी म्हणून अमलात आणा मग बघा कसे व्यवस्थित पाने तुम्ही मनी मॅनेजमेंट करू शकाल.

बाहेर काही कामासाठी जाताना खाऊन निघा. वेळ आणि पैसे दोन्ही पण वाचेल. कोणाला बरोबर नेणार असाल तर त्याला पण खाऊन यायला सांगा. कस असत आपण जरी जेवलो असलो तरी समोरचा भूक लागली असे म्हंटल्यावर चल काहीतरी खाऊ असं म्हणण्या शिवाय काहीच पर्याय नसतो. त्यामुळे शक्यतो घरीच खाऊन बाहेर पडायला शिका. साधा नाश्ता करायचा म्हंटल तरी त्यासाठी किमान एका व्यक्तीला 20 रुपये इतके पैसे किमान लागतात.

उगीच रस्त्यावरचे खाऊ नका. रस्त्याच्या कडेला 10 मिनिटे थांबून पहा त्या 10 मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर किती धूळ जमा होते ते पहा आणि मगच रस्त्यावरचे खायचा विचार करा.

ड्रेनेज वर असलेल्या टपऱ्या, अस्वच्छ हॉटेल्स मध्ये खायचे टाळा. 10 रुपयाच्या समोसा तुम्हाला दवाखान्यात 10 हजार रुपयाला पडू शकतो.  हॉटेल व्यवसायात आठ पैसे गुंतवणूक असलेले पदार्थ 20 ते 30 रुपये किमतीने देखील विकले जातात. जास्तीत जास्त कितीही असू शकतात. त्यामुळे शक्यतो घरीच खाणे पसंत करा. आपल्या सोबत असणारे लोकं ज्यांना बाहेर पार्ट्या करणे. सतत काहीतरी वस्तू खरेदी करणे अशा गोष्टी खूप प्रिय असतात. अशा लोकांपासून लांब राहा. कामात व्यस्त राहा. जितके रिकामे असाल तितका खर्च करायचा विचार डोक्यात येतो.

खरेदी करायची नसेल तर ते झोमॅटो, स्वीगी , अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या अप्लिकेशन कडे पाहणे बंद करा. बऱ्याचदा आपले बजेट नसताना देखील हे लोक आपले ब्रेन वॉशिंग करून टाकतात. जेणे करून आपण ती वस्तू विकत घेण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. महत्वाच्या वस्तू जसे की शूज, मोबाईल, सूट, घरातील पंखे, वॉशिंग मशीन , इतर उपकरणे,ई ह्या वस्तू एकदाच पण चांगल्या ब्रँडेड घ्या म्हणजेच रिपेरिंग पासून सुटका मिळेल. काय होत की कमी किमतीत मिळते म्हणून आपण स्वस्त वस्तू घेतो खरी पण मात्र सतत बंद पडून वर्षा दोन वर्षात त्याच्या दुप्पट खर्च होतो. कपड्याच्या बाबतीत देखील तसंच. त्यामुळे आपल्याकडच्या वस्तूंची योग्य काळजी घ्या. वेंधळेपणा कमी करून वागणे यामुळे बऱ्याच गोष्टींची होणारी तोडफोड वाचू शकते.

जसे चष्मा, मोबाईल, घड्याळं, कडपे, चप्पल अशा छोट्या छोट्या गोष्टी वेंधळेपनाणे वापरल्याने सतत बदलाव्या लागतात. दिसून येत नाही मात्र बराच खर्च होतो. काहीही ट्रेंड वाले घेऊ नका कारण ट्रेंड्स तात्पुरते असतात. कपडे किंवा वस्तू घेताना ती वस्तू नेहमी वापरता येईल अशीच घ्या. बरेच हौस म्हणून घेतलेले आपले कपडे असतात जे एकदा घातल्यावर तसेच पडून राहतात. जसे उगाच ट्रेंड म्हणून घेतलेले संग्राम कुर्ता, अपना टाइम अयेगा चे टी शर्टस,ipl चे शर्टस, इतर कोणत्याही फॅशन जास्त काळ त्याची रुची राहत नाही.

काही ठराविक रक्कम बँक खात्यात मिळत असेल तर तुम्ही महिन्याची फिक्स डिपॉझिट किंवा रीकरिंग डिपॉझिट ठेऊ शकता. फक्त रुपये 100 पासून हे सुरू करता येते. शिवाय त्यावर व्याज देखील मिळाल्याने ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळते. आणि सोबतच पैसे सुरक्षित देखील राहतात. आपण बऱ्याचदा  महागडे गिफ्ट घेतो. ज्या वस्तू दीर्घकाळ राहत  नसतात. असे गिफ्ट देण्या ऐवजी चिरकाल आठवणीत राहील असे काही द्या. जसे की कुठे फिरणे किंवा त्या व्यक्तीला पुढेही उपयोगी येईल अशी तरतुद करणे.

ज्याला उसने पैसे दिलेत त्याला परत उसने पैसे देऊ नका.पाहिले पैसे मिळायच्या आशेने तुम्ही अजून पैसे देता पण तुम्ही स्वतःला अजून गरिबीत ढकलत असता. फ्लॅट घ्यायचा की भाडे भरायचे हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण शक्य असेल तर शहरापासून थोडा लांब फ्लॅट घेतला की भाड्यापेक्षा हप्ता नक्की कमी येऊ शकतो किंवा जास्त नसू शकतो.आणि तसेपण लोकसंख्या वाढतेय शहर मोठे होणारच आहे. गरजेच्याच वस्तू विकत घ्या. आधी ती वस्तू खरच महत्वाची आहे का त्याचा विचार करा.ती वस्तू पाहिले रेंट ने आणायचा प्रयत्न करा किंवा मित्रांकडून उसनी घ्या महत्वाची वाटत असेल तरच विकत घ्या.

घरातून बाहेर फक्त सहज मित्रांच्यात बाहेर जाणार असाल तर पैसे घेऊन जाऊ नका. कारण कमीत कमी पैसे जवळ असतील तर आपण खर्च करण्याविषयी  जास्त विचार करणार नाही. याउलट जास्त पैसे सोबत असतील तर मात्र एकतर मित्र तरी आपल्याला खर्च करायला लावतील किंवा आपण तरी उदार होऊ.. आणि असे 100 पैसे 80 वेळा होते.

सगळ्या सिम कार्ड्स, सबक्रिप्शन , मोलकरीण चे पगार, दूधवाला, पेपर वाला, लाईट बिल जे जे खर्च दर महिन्याला किंवा नेहमी होतात त्यांची लिस्ट बनवा व खर्च कसा कमी करता येईल ते पहा. जसे मोलकरीण ऐवजी वॉशिंग मशीन घेता येईल, किंवा डिश वाशर घेता येईल, पेपर ऐवजी ऑनलाईन पेपर वाचता येईल ( फक्त, कागद पाहिजे असल्यावर रद्दी घेता येईल ), मोबाईल च्या मोठ्या पॅक ऐवजी वायफाय असल्यावर छोटा पॅक टाकता येईल, नेटफलिक्स घेण्या ऐवजी टेलिग्राम वर सिरीज पाहता येतील, पुस्तकं ऐवजी ईबुक घेता येतील ( खूप आयडिया आहेत पण उत्तर मोठे होईल )

स्वतःच्या मुलांना , जवळच्या मित्रांना, किंवा ज्यांचा आणि तुमचा संबंध येतो त्या प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टी शिकवा.म्हणजे त्यांना तुम्हाला फालतू गोष्टींसाठी मदत करावी लागणार नाही व तुम्ही त्यांच्यासाठी जास्त काही चांगले करू शकता. पैशाचे हिशोब ठेवायला एखादे अँप वापरा जेणेकरून समजेल पैसे कुठे जात आहेत.ज्यावर पैसे जास्त खर्च होतात त्या वस्तू ,गोष्टी टाळा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *