विचारधारा

तुमची गरीब राहण्याची ही आहेत कारणे

सध्या सर्वांची एकच तक्रार असते. कितीही पैसे कमावले तरी ते सेविंग राहत नाही. कितीही काही केलं तरी महिन्याच्या शेवटी हातात काही राहत नाही. अनेकांची ही तक्रार असते पण यावर उपाय म्हणून आपण कधी काही करतो का? स्वतःला याबद्दल असा प्रश्न विचारला आहे का? की मी कशा प्रकारे पैसे जपून ठेऊ शकतो. तुम्ही हाच विचार करत नाही म्हणून अजूनही तुम्ही गरीब आहात.

किती दिवस असे गरीब राहणार आहात? चला आज पाहूया तुमच्या गरीब राहण्याची ही तर कारणे नाहीत ना? तुमच्या हातात महिन्याचा पगार आला की तुम्ही फार खुश होता. कुठे पैसे संपवू आणि कुठे नको असे विचार सुरू होतात. हे तुमचं असे नाही सर्वाचे हे असेच असते. त्यासाठी नेहमी एक गोष्ट करा. स्वतःवर कंट्रोल ठेवा. गरज असेल तिथेच पैसे खर्च करा. विनाकारण पैसे खर्च करू नका.

स्वतवर गुंतवणूक करणे थांबवा. महागडे मोबाईल, सुख सोईच्या गोष्टी घेणे गरज नसताना टाळा. आता तुम्ही म्हणाल आम्ही पैसे तर स्वतःसाठी कमवतो मग खर्च का नाही करावे पण आधी बरीच वर्ष पैसे कमवा, सेवींग करा मग तुम्हाला हवे तेवढे पैसे स्वतःवर उधलवू शकता. बघा एकदा हे करून पहा नक्कीच तुमची सेविंग जास्त प्रमाणात राहील.

तुम्ही नेहमी आयुष्यात एकदा शिक्षण पूर्ण झालं की जॉब करता आणि एकदा का जॉब सुरू झाला की नवीन काही शिकण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. करायला हवा कारण नवीन शिकलेले द्यान आणि आलेला अनुभव आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातो. कारण नेहमी वेगळं काही शिकल्याने अनेक संधी निर्माण होतात आणि त्यातून आपण पैसे कमावू शकतो. मग पैश्याची साठवणूक सुद्धा करू शकतो.

आधी तर मी हे करू शकत नाही, हे मला जमणारच नाही असा विचार करणे सोडून द्या. यानेच तुम्ही अर्धी लढाई हरता. कारण कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना मला जमेल का? मी यशस्वी होईल का? त्यातून काही साध्य होईल का? हे विचार केल्याने तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असल्यास मला हे जमणार नाही यापेक्षा मी हे जमवून दाखवेन असे म्हणायला शिका.

कोणतीही गोष्ट करताना रिस्क आहे म्हणून ती सोडू नका. रिस्क तर प्रत्येक गोष्टीत असतो. काही करण्या अगोदरच त्या गोष्टीत रिस्क आहे कशी साध्य करू हा विचार केलात तर काहीही होणार नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात उतरण्या अगोदर रिस्क आहे म्हणून घाबरून जाऊ नका. रिस्क शिवाय पैसा जवळ येत नाही.

हातात पैसे आल्यावर गुंतवणूक करायला शिका. हातात आलेल्या पगाराच्या कमीतकमी ३० टक्के रक्कम ही सेविंग झालीच पाहिजे. स्वतःला या गोष्टीची सवय लावून ठेवा. मला तीस टक्के पगार हातात कमीच येतो असे समजून साठवणूक करा. भविष्यासाठी तुम्ही मुच्युअल फंड मध्ये सुद्धा पैसे गुंतवू शकता. एका विशिष्ट कालावधी साठी तुम्ही SIP सुद्धा करून ठेऊ शकता. आधी कमी पैशाने सुरुवात करा मग ही संख्या वाढवत चला.

शक्य असल्यास क्रेडिट कार्ड घेणं टाळा. क्रेडिट कार्ड मुळे, तुमच्या खिशाला नेहमी फटका बसतो आणि याचा अनुभव कधीच तुम्हाला येत नाही. कारण खिशात पैसे नसले तर आपण काहीही गोष्ट घेताना विचार करतो पण तेच हातात क्रेडिट कार्ड असेल तर पैसे नसले तरी सुद्धा सर्रास शॉपिंग करून मोकळे होते. मग महिन्याच्या शेवटी भलंमोठं बिल हातात येत. त्यात जर तुम्ही हे बिल महिन्याच्या शेवटी भरले नाही तर याचे रेट ऑफ चार्जेस सर्वात जास्त असता आणि हे आपल्याला माहीत सुद्धा नसते. म्हणून शक्य तो क्रेडिट कार्ड घेणे टाळा.

शेवटचे आणि महत्त्वाचे ते म्हणजे आयुष्यभर फक्त नोकरीच्या भरोष्यावर राहणे. पैसा वाढवायचा असेल तर फक्त नोकरी करून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला छोटासा का होईना पण व्यवसाय करावा लागेल. लक्षात ठेवा सुरुवात नेहमी छोट्या गोष्टीतूनच होते. मग हळूहळू त्याचा मोठा पर्वत होतो. जर तुम्हाला गरीब राहायचे नसेल तर व्यवसायामध्ये प्रवेश करा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *