हेल्थ

हिवाळ्यात ओठ फुटणे हा त्रास सर्वानाच होतो वाचा त्यावरील उपाय

ओठ आपल्या सौंदर्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांची निगा राखणे आपल्या हातात आहे. हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे थंडीच्या या वातावरणात आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भाग म्हणजे आपले ओठ, हे लगेच सुकतात ड्राय होतात, तडकतात म्हणजेच त्यांना आपण ओठ फुटणे असणे म्हणतो. त्यात ओठ तडकतात त्यातून रक्त येते ओठ झोंबतात. आता हिवाळा तर दरवर्षी येणारच पण आपले ओठ कसे कोमल राहतील यावर उपाय बघूया.

हिवाळ्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे ओठ फुटतात. हिवाळ्यात पाणी आपल्या पोटात जास्त जात नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या. तसेच फळे ही खा त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच शहाळ्याचे पाणी ही पिऊ शकता. वातावरणातील बदल उन्हाळ्यात ही ओठ फुटतात. प्रखर सूर्यप्रकाश यामुळे ही शरीरातील पाणी शोषले जाते त्यामुळे ही ओठ फुटू शकतात.

बाहेर जाताना एकदा नॅचरल लीप ग्लोस जवळ ठेवा. म्हणजे आयत्यावेळी तुम्हाला तो सहज ओठांना लावता येईल.ओठ फुटले असतील शिवाय त्यांची आग होत असेल तर गावठी तूप चोळा तुम्हाला फरक जाणवेल. तसेच दुधावरची साय ही चोळू शकता त्यानेही फरक पडतो. रात्री झोपताना लावले तर उत्तमच.

रोज नियमित तुम्ही ओठांना खोबरेल तेल चोळा त्यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. शिवाय शिला बटर ही चोळू शकता. तसेच बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल आणि जोजोबा तेल ही तुम्ही वापरू शकता. सध्या तरुणांमध्ये लीप बामचा जास्त उपयोग होताना दिसतो तो ही तुम्ही वापरू शकता. ओठांना तडे गेले असतील तर तर तिथे मध चोला शिवाय कोरफडीचा गर ही त्या ठिकाणी चोळू शकता.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *