हेल्थ

रात्रीचा शिळा भात उरतो ना मग एकदा हे करून पहा

शिळा भात म्हंटला की, त्याचा काय करायचा हा प्रश्न नेहमीच घरातील गृहिणीला पडतो. पण नेहमी नेहमी फोडणीचा भात खाऊन ही घरातील कंटाळलेले असतात त्यांना नवीन काय करून देऊ शकतो असे नेहमीच तुम्हाला वाटत असेल. मग आता या उरलेल्या शिळ्या भाताच काय करायचं खर पाहायला गेलात तर या शिळ्या भाताचे तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. तेही घरातील वस्तूपासून आणि चवीला ही अतिशय चवदार असे पदार्थ आहेत.

इडली – उरलेल्या भाता पासून तुम्ही इडली बनवू शकता त्यासाठी रवा आणि खायचा सोडा ही लागेल मिक्सर मधून काढून हवे तेव्हढे पाणी घाला आणि इडल्या काढा. सध्या फोडणीचा भात खाऊन कंटाळला असाल तर लेमन राइस, भाज्या घालून पुलाव राइस, किंवा मसाले भात ही करू शकता.

पराठे – राहिलेला शिला भात किंवा राहिलेली मुगाची खिचडी त्यात थोड गव्हाच पीठ मिक्स करा अजून त्यात मीठ मिरची, कोथिंबीर जिर, धन पूड, वाटल्यास थोडी कसुरी मेथी घालावी आणि मळून पराठे गरम गरम खा. उरलेल्या भाताचे भाजी ही तुम्ही बनवू शकता त्यात थोडी कोथिंबीर, मिरची, कांदा, आणि थोड तांदळाचे पीठ मिक्स करा आणि भाजी काढा.

कटलेट – उरलेला भात त्यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या घ्या. शिवाय मसाले, मीठ घ्या याशिवाय त्यात उकडलेला बटाटा आणि सोया क्रंच इकडून मॅश करून बनवा आणि ब्रेड क्रमस मध्ये घोळवून तळा. तसेच हा भात मिक्सर ला लाऊन त्यात थोड तांदळाचे सुके पीठ मिक्स करून त्याच्या भाकरी ही करू शकता.

शिळा भात खा पण जास्त वेळ शिळा राहिलेला भात खाऊ नये तो आपल्या शरीरासाठी अपायकारक असतो. तसेच कोणताच पदार्थ जास्त वेळ शिळा ठेऊन काहून नये.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *