मनोरंजन

सुंदर मनामधे भरली या मालिकेतील व्हीलन दौलत

कलर्स मराठी वरील “सुंदरा मनामधे भरली ही मालिका ” अल्पावधीतच लोकप्रिय झाली. त्यातील कलाकारांचा अभिनय ही लोकांना उत्तमच आहे. याशिवाय नकारात्मक भूमिका करणाऱ्या दौलतचा रोल ही प्रेक्षकांना आवडत आहे. अभी आणि लतिका सोबतच दौलत तितकाच प्रसिद्ध झाला आहे. आता ह्या दौलत बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

दौलतचे खरे नाव हृषिकेश शेलार असे आहे. हृषिकेश हा मूळचा राहणारा सांगली मधील आहे. त्याचा जन्म आणि शिक्षण हे सुध्दा सांगली मधेच झाले. याच ऋषिकेशची मालिकेतील गर्लफ्रेंड ही कामिनी आहे पण खऱ्या जीवनात दौलतचे लग्न झालेले आहे. त्याच्या बायकोचे नाव स्नेहा अशोक मंगल असे आहे.

ऋषिकेश यांची बायको ही सुद्धा अभिनेत्री आहे तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे याशिवाय आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर, गर्ल हॉस्टेल, सोनी मराठी वाहिनीवरील दुनियादारी, जिजामाता या मालिकांमध्ये काम केले आहे. ऋषिकेश याने आपल्या करियरची सुरुवात “लक्ष्मी सदैव मंगलंम” या मालिकेतून केली होती.

Source Hrishikesh Shelar Social Handle

त्याच्यासोबत या मालिकेत समृध्दी केळकर ही होती. त्यानंतर त्याने “स्वराज्य जननी जिजामाता” या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम केले आहे. त्याचबरोबर त्याने “शांतेचे कार्ट चालू आहे” या नाटकांत ही काम केले आहे. साध्य चालू असलेल्या “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतील त्याचा केस वाढवलेला नेत्याचा मुलगा स्वतःच्या मनाला वाटेल तसा वागणारा हा दौलत त्याची भूमिका तुम्हाला ही आवडते का सांगा कॉमेंट करून.

हे पण आर्टिकल वाचा. सज्जनराव बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित नसतील

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *