मनोरंजन

तुमची आवडती ऋता दुर्गुळे दिसणार झी मराठीच्या ह्या सीरियलमध्ये

सध्या झी मराठी वाहिनीने बऱ्याच मालिका हद्दपार करायच्या ठरवल्या आहेत आणि प्रेक्षकांना काहीं तरी नवीन दाखवायचा प्रयत्न झी करत आहे. बघुया यात किती पर्यंत यशस्वी होतात. नवीन चार मालिका सुरू होत आहेत ह्यात एक म्हणजे मन उडू उडू झालंय. ही मालिका 30 ऑगस्ट संध्याकाळी 7.30 वाजता आपल्या भेटीला येत आहे.

पण ह्या मालिकेचा पहिला प्रोमो आला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण ह्यात अशी अभिनेत्री पुन्हा एकदा सीरियल करत आहे जी महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखळत. फुलपाखरू फेम नायिका ऋता दुर्गुळे ह्या सीरियल मध्ये मुख्य भूमिकेत आहे. तिचे लाजणे, तिचे हसणे, तिचे वावरणे, अगदीच सर्वच गोष्टीची आवड लोकांमध्ये आहे. युवा पुरुष तिच्या दिसण्यावर फिदा आहेत.

फार थोड्या काळातच तिने फुलपाखरू मधील रोल करताना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय विठू माऊली या मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत हे दोघे ही या मधे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यावर काहीही या प्रोमोवर चांगल्या कमेंट केल्या त्यांना खरंच या मालिकेची आतुरता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये भर रस्त्यात एका तरुणाला मारणारा नायक हा नायिकेला बघून घायाळ होतो आणि मारायचा थांबतो आणि रस्त्यातच पुषअप करण्याचे नाटक करतो.

तो एकटक तिच्याकडे बघत असतो पण नायिका त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाते. याचा अर्थ काय तर अजिंक्य हा एक मवाली आणि गुंडगिरी करणारा मुलगा दाखवला आहे तर ऋता एक साधी सरळ मुलगी दाखवली आहे. ऋता जवळ जवळ दोन वर्षांनी मालिकेत पुन्हा परत येत आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून तुम्हाला कसं वाटलं याशिवाय यातील ऋताची भूमिका तुम्हाला आवडेल का ही सुध्दा कॉमेंट करून सांगा.

फुलपाखरू नंतर हृता उमेश कामत सोबत दादा एक गुड न्यूज आहे ह्या नाटकातून आपल्याला दिसली होती. ह्या नाटकाचे सुधा अनेक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात झाले. ह्यांनातर ऋता टाइमपास ३ सिनेमात दिसणार आहे. प्रथमेश परब सोबत स्क्रीन शेअर करताना त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी असेल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *