विचारधारा

नवरा बायकोचे नातं कसे असायला हवे ज्याने संसार सुखाचा होईल

पती पत्नीच नातं हे लग्नाच्या सात फेऱ्यानंतर सुरू होते ते शेवटपर्यंत राहते. हे नाते जसे भक्कम असते तसेच ते नाजुकही असते. यामधे कोणत्याही क्षणी दुरावा येऊ शकतो. म्हणून हे नाते काळजीपूर्वक सांभाळायचे असते. त्यासाठी आपले नाते हे नेहमीच विश्वासावर अवलंबून असते जिथे विश्वास तुटला तिथे नाते तुटायला वेळ लागत नाही.

लग्नाचे नाते टिकवायचे असेल तर पतीने ही पत्नीला समजून घ्यायला हवे. काही गोष्टी अशा असतात ज्यांचा तिला त्रास होतो म्हणजे काय तर मासिक पाळी येणे. अशा वेळी पतीने तिला धीर द्यायला हवा, तिला कामात मदत करायला हवी, शरीर संबंध नाहीच ठेवावे. त्यामुळे पत्नीला तुमच्या बद्दल आपुलकी वाटेल.

तिला काय हवं नको ते पाहणे हे तुमचं कर्तव्य आहे. घरात झालेली भांडण म्हणजे घरातील सर्वच व्यक्तींसोबत त्यासाठी जास्त तमाशा करायची गरज नाही. ही समस्या घरातच सोडवा. त्यासाठी दोन्ही बाजू समजून घ्या सगळ्यांना समजून सांगा. याने भांडण मिटतील.

पती पत्नीमध्ये एकमेकांना वेळ न देणे ही सध्याची परिस्थिती आहे. आणि यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत असतात. पण भांडणे करून काहीच उपयोग नाही याचा शेवट मग घटस्फोट पर्यंत जातो. म्हणून त्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना फोन करने, एक दिवस तरी दोघांनी एकमेकांसाठी सुट्टी घेऊन फिरायला जाणे, अशा अनेक गोष्टी आहेत.

चुका दोघांच्याही हातून होत असतात पण एकमेकांच्या चुका काढण्यात काहीच अर्थ नसतो. त्याने भांडणे अधिक वाढतात त्यापेक्षा दोघांनीही ती गोष्ट समजून घ्या असे पुन्हा होणार नाही किंवा अनेक अशा गोष्टी आहेत त्या समजून घेऊ शकतात.

या कारणावरून जास्त भांडणे होत असतात की त्याला किंवा तिला माझ्या मनातले कळतच नाही. समजत नाही तो किंवा ती काय देव आहे का समजायला? पण त्याच्या मधील आवडी निवडी, बाकी सगळ्या गोष्टी ह्या हळू हळू तरी जोडीदाराला माहिती असायला हव्यात त्यातून नाते अधिक घट्ट होते.

आपला जोडीदार आर्थिक, सामाजिक दृष्ट्या कमकुवत असेल तर अशा वेळी त्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्याला धीर द्या तुम्ही पाठीशी राहिलात तर जोडीदार ह्या गोष्टीत ही पुढे जाई. टीव्ही, मोबाईल यामुळे दोघांच्यात दुरावा येत असेल तर त्या गोष्टी तुम्ही थोड्या लांब ठेवायला हव्यात जेणेकरून तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

काही गोष्टी अशा होतात की एकमेकांना त्याबद्दल समोरच्याची वाहवा करणे गरजेचे आहे. अशा वेळी ते करणे गरजेचे आहे. नवरा बायको या नात्यात फक्त प्रेम असावे थोडी फार भांडणे असावी पण स्पर्धा अजिबात नसावी. नवरा बायकोचे नाते म्हणजे काय तर आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्यात त्या स्वीकारा त्यातच आनंदी रहा.

दुसऱ्याकडे बघून त्याला ते मिळालं, मग मला का नाही या गोष्टी सोडून द्या जे मिळाले आहे त्यात आनंदी रहा. त्यातूनच आनंद मिळेल आणि तुमचा संसार सुखाचा राहील. फीचर इमेज क्रेडिट दीपिका प्रसाद वेद पाठक.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *