बातमी

एलपीजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ, चार दिवसांत दुसरी दरवाढ

सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का बसनार आहे, एलपीजी सिलिंडरच्या किंमती सोमवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढविण्यात आल्या. तीन दिवसांपूर्वीच दर २५ रुपयांनी वाढविण्यात आला होता. दिल्लीमधे १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ८१९ रुपये झाली आहे. १ मार्च पासून नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

२५ फेब्रुवारी रोजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढविण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी दरवाढ होती. यापूर्वी ४ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारीला किंमती वाढविण्यात आल्या होत्या.

डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली. १ डिसेंबर रोजी त्याचा दर ५९४ रुपयांवरून ६४४ रुपये करण्यात आला आणि नंतर १५ डिसेंबरला त्याची किंमत पुन्हा वाढवून ६९४ रुपये करण्यात आली.

म्हणजेच एका महिन्यात १०० रुपये वाढविण्यात आले. तथापि, जानेवारीमध्ये किंमती वाढविण्यात आल्या नव्हत्या. जानेवारीत विना अनुदानित एलपीजी (१४.२ केजी) ची किंमत ६९४ रुपये होती.

फेब्रुवारीच्या सुरूवातीस, देशांतर्गत गॅसच्या किंमतीत वाढ केली गेली नव्हती केवळ ६९४ रुपयांच्या जुन्या किंमतीत उपलब्ध होऊ लागली. परंतु ४ फेब्रुवारीला हा दर पुन्हा वाढवून ७१९ रुपये करण्यात आला. म्हणजेच २५ रुपयांची वाढ झाली. दहा दिवसातच एलपीजीच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करुन ती ७६९ रुपयांवर गेली.

ही दरवाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आधीपासूनच्या उच्चांकाला भिडल्या आहेत. विशेष म्हणजे १ मार्चला देखिल सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २८ फेब्रुवारीलाही दर स्थिर राहिले.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *